ravinfdra jadeja  twitter
Sports

Ravindra Jadeja Retirement: रविंद्र जडेजाचा वनडे क्रिकेटला रामराम? विराटने Live सामन्यात दिली हिन्ट

Ravindra Jadeja Retirement News: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलचा सामना पार पडला. या सामन्यानंतर रविंद्र जडेजा वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करु शकतो.

Ankush Dhavre

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनल झाल्यानंतर वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करु शकतो. या स्पर्धेतील फायनलचा सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना झाल्यानंतर जडेजा वनडे क्रिकेटला रामराम करु शकतो.

भारतीय संघ या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. प्रथम गोलंदाजी करताना रविंद्र जडेजाने आपल्या १० षटकांची स्पेल संपवल्यानंतर विराट कोहलीने त्याला मिठी मारली. यावरुन जडेजाच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे.

भारत आणि न्यूझीलंड या सामन्यातील पहिला डाव संपल्यानंतर, रविंद्र जडेजाच्या निवृत्तीच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना त्याने १० षटकात ३० धावा खर्च केल्या आणि १ गडी बाद केला. यादरम्यान त्याने टॉम लेथमला बाद करत माघारी धाडलं. या स्पर्धेत गोलंदाजी करताना त्याने ४ गडी बाद केले आहेत. तर फलंदाजी करताना त्याला १८ धावा करता आल्या आहेत.

अशी राहिलीये कारकिर्द

रविंद्र जडेजाच्या वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यातून आपल्या वनडे कारकिर्दीला सुरुवात केली होती. गेल्या १६ वर्षांपासून तो भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करतोय.

यादरम्यान तो नेहमीच टॉपच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत राहिला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील फायनलचा सामना खेळण्यापूर्वी त्याने २०३ वनडे सामने खेळले होते. यादरम्यान त्याने २९७९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १३ अर्धशतक झळकावली आहेत. तर त्याच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने २३० गडी बाद केले आहेत.

टी-२० क्रिकेटला केलंय रामराम

यापूर्वी आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार अमेरिका आणि वेस्टइंडीजमध्ये पार पडला होता. या स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. या स्पर्धेतील फायनलचा सामना झाल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी-२० क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जडेजानेही निवृत्तीचा निर्णय घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! निवडणूक आयोगाच्या पथकाकडून शिंदेंच्या मंत्र्यांची बॅग तपासणी|VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो

Crime News : तुझी शेवटची इच्छा काय? सिगारेट अन् दारू पाजली, नंतर धारदार शस्त्राने वार करत मित्राला संपवलं; हत्याकांडाने पुणे हादरले

Brain Tumor: सतत होणारी डोकेदुखी म्हणजे ब्रेन ट्यूमर तर नाही? न्यूरोसर्जनने सांगितलं कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये

Prajaktaraj: प्राजक्ता माळीने नम्रता संभेरावला दिले खास शिंदेशाही तोडे, PHOTO पाहा

SCROLL FOR NEXT