wankhede stadium saam tv
Sports

IND vs NZ 3rd Test: मुंबईत धावांचा पाऊस पडणार की विकेट्सची रांग लागणार? कशी असेल खेळपट्टी?

India vs New Zealand 3rd Test Pitch Report: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.

Ankush Dhavre

India vs New Zealand 3rd Test,Pitch Report: भारतीय संघावर कसोटी मालिका ३-० ने गमावण्याचं संकट आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या ३ सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाजांना मदत मिळाली होती.

तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाजांना मिळत होती. मालिकेतील तिसरा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी खेळपट्टी कशी असेल? जाणून घ्या.

असा राहिलाय भारतीय संघाचा रेकॉर्ड

या मैदानावर खेळताना भारतीय संघाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. १९७५ नंतर भारतीय संघाने या मैदानावर २६ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान भारतीय संघाला १२ सामने जिंकता आले आहेत.

तर ७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि ७ सामने ड्रॉ राहिले आहेत. या मैदानावर भारताचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. २०१२ मध्ये इंग्लंडने याच मैदानावर भारतीय संघाचा पराभव केला होता. त्यानंतर भारतीय संघाने या मैदानावर एकही सामना गमावलेला नाही.

खेळपट्टी कोणाला देणार साथ?

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टी रँक टर्नर नसणार आहे. पुण्यात झालेल्या कसोटीत डावखुऱ्या हाताच्या मिचेल सँटनरने आपल्या फिरकी गोलंदाजीच्या तालावर नाचवलं होतं.

त्याने पहिल्या डावात गोलंदाजी करताना ७ आणि दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना ६ गडी बाद केले होते. त्याने दोन्ही डावात मिळून १३ गडी बाद केले होते. वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टीवर गवत आहे. त्यामुळे ही खेळपट्टी पहिल्या दिवशी फलंदाजीसाठी अनुकूल असेल. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून फिरकी गोलंदाजांना मदत मिळायला सुरुवात होईल. असं पिच क्यूरेटरचं म्हणणं आहे.

यापूर्वी २०२१ मध्ये झालेल्या कसोटीत भारतीय संघाने न्यूझीलंडला ३७२ धावांनी धूळ चारली होती. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने ३२५ तर दुसऱ्या डावात २७६ धावा केल्या होत्या. तर न्यूझीलंडला पहिल्या डावात ६२ आणि दुसऱ्या डावात १६७ धावा करता आल्या होत्या. या सामन्यातही फिरकी गोलंदांचा बोलबाला पाहायला मिळाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT