team india twitter
Sports

IND vs BAN 2nd Test: अशक्य ते शक्य केलं... दोन दिवसांतच बांगलादेशला नमवलं, रोहितसेनेचा 7 विकेट्सने विजय

India vs Bangladesh 2nd Test Highlights: भारत आणि बांगलादेश यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला आहे. यासह मालिका २-० ने खिशात घातली आहे.

Ankush Dhavre

India vs Bangladesh 2nd Test, Day 5: भारतात कसोटी क्रिकेट खेळताना भारतीय संघाचा दबदबा कायम आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय संघाने मायदेशात खेळताना एकही कसोटी सामना गमावलेला नाही. यात एका मालिकेची भर पडली आहे. भारतीय संघाने बांगलादेशचा चांगलाच समाचार घेत दुसऱ्या कसोटी सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत बांगलादेशचा २-० ने सुपडा साफ केला आहे.

या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाने २८० धावांनी एकतर्फी विजय मिळवला होता. आता दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय संघाने दमदार कामगिरी करत बांगलादेशचा दारुण पराभव केला आहे. या सामन्यातील ३ दिवस पावसामुळे धुतले गेले. मात्र चौथ्या आणि पाचव्या दिवशी भारतीय संघातील गोलंदाज आणि फलंदाजांनी दमदार कामगिरी केली आणि विजय खेचून आणला.

बांगलादेशने केल्या २३३ धावा

या सामन्यात भारताचा कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. बांगलादेशकडून फलंदाजी करताना मोमिनूल हकने सर्वाधिक १०७ धावांची खेळी केली. तर शदमन इस्लामने २४ आणि कर्णधार नजमूल शांतोने ३१ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर बांगलादेशने २३३ धावांपर्यंत मजल मारली.

भारतीय संघाला सामन्यातील चौथ्या दिवशी फलंदाजी करण्याची संधी मिळाली. ड्रॉ होणारा सामना जिंकण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावात धावांचा पाऊस पाडला आणि सर्वात वेगवान धावांचा रेकॉर्डब्रेक करत स्कोअरबोर्डवर ९ गडी बाद २८५ धावा लावल्या. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ६८ आणि विराट कोहलीने ४७ धावांची खेळी केली.

बांगलादेशचा फ्लॉप शो

पहिल्या डावात २३३ धावांपर्यंत मजल मारणाऱ्या बांगलादेशला दुसऱ्या डावात १४६ धावा करता आल्या. बांगलादेशकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना शदमन इस्लामने ५० धावांची खेळी केली. तर शेवटी मुशफिकुर रहीमने ३७ धावांची खेळी केली. भारतीय गोलंदाजांच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर बांगलादेशचा डाव अवघ्या. १४६ धावांवर आटोपला. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या ९५ धावांचे आव्हान होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहलीने शानदार खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT