Rohit Sharma: उगाच हिटमॅन म्हणतात का...रोहितने मोडला १४७ वर्षांत कोणालाच न जमलेला रेकॉर्ड

Rohit Sharma Record News In Marathi: भारताचा कर्णधार रोहित शर्माने बांगलादेशविरुद्ध लागोपाठ २ षटकार खेचत मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
Rohit Sharma: उगाच हिटमॅन म्हणतात का...रोहितने मोडला १४७ वर्षांत कोणालाच न जमलेला रेकॉर्ड
rohit sharmatwitter
Published On

Rohit Sharma Record, IND vs BAN 2nd Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील चौथ्या दिवशी रोहितने असं काही केलं आहे, जे याआधी कोणालाच जमलं नव्हतं. बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांवर आटोपल्यानंतर भारतीय संघाची फलंदाजी आली. रोहित आणि यशस्वी जयस्वालची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आली.

भारतीय आक्रमण करायचं याच उद्देशाने मैदानात उतरला होता. कारण सुरुवातीला जयस्वालने ३ चौकार मारले. त्यानंतर पुढच्याच षटकात रोहितने सुरुवातीचे दोन्ही चेंडू मैदानाबाहेर पोहोचवले. यासह रोहित कसोटी क्रिकेटमधील सुरुवातीच्या दोन्ही चेंडूंवर षटकार मारणारा जगातील एकमेव सलामीवीर फलंदाज ठरला आहे.

असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच सलामीवीर फलंदाज

रोहित शर्माने खलिल अहमदच्या सुरुवातीच्या दोन्ही चेंडूंवर २ षटकार खेचले. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना सुरुवातीच्या २ चेंडूंवर षटकार मारणारा जगातील पहिलाच सलामीवीर फलंदाज ठरला आहे.

याआधी १९४८ मध्ये फॉफी विलियम्सने हा कारनामा केला होता. त्यानंतर २०१३ मध्ये सचिन तेंडुलकरने सुरुवातीच्या दोन्ही चेंडूवर षटकार खेचले होते. उमेश यादवने २०१९ मध्ये देखील २ चेंडूवर सलग २ षटकार खेचले होते. आता रोहित चौथा फलंदाज ठरला आहे. मात्र सलामीवीर म्हणून रोहित अव्वल स्थानी आहे.

Rohit Sharma: उगाच हिटमॅन म्हणतात का...रोहितने मोडला १४७ वर्षांत कोणालाच न जमलेला रेकॉर्ड
IND vs BAN 2nd Test: भारत - बांगलादेश कसोटीत चौथ्या दिवशी सॉलिड ट्विस्ट; उद्या थेट रीझल्ट लागणार

या रेकॉर्डवरही कोरलं नाव

रोहित आणि जयस्वालच्या जोडीने मैदानात येताच बांगलादेशवर हल्लाबोल केला. रोहितला चांगली सुरुवात मिळाली मात्र डाव पुढे घेऊन जाता आला नाही. त्याला या डावात २३ धावा करता आल्या.

दोघांनी सलामीला फलंदाजी करताना ३ षटकात ५० धावांचा पल्ला गाठला. यापूर्वी कुठल्याच सलामी जोडीने ३ षटकात ५० धावांचा पल्ला गाठला नव्हता. यासह अवघ्या १० षटकात भारतीय फलंदाजांनी १०० धावांचा पल्ला गाठला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यादांच कुठल्या संघाने १० षटकात १०० धावांचा पल्ला गाठला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com