ind vs ban twitter
क्रीडा

IND vs BAN: केव्हा, कुठे अन् कधी पाहता येणार दुसरा सामना? पाहा एकाच क्लिकवर

Ankush Dhavre

India vs Bangladesh 2nd T20I Live Streaming And Match Details: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत ७ गडी राखून विजय मिळवला. तर मालिकेतील दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार आहे.

मालिकेतील पहिला सामना जिंकलेला भारतीय संघ दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर बांगलादेशचा संघ कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान हा सामना केव्हा आणि कुठे लाईव्ह पाहता येणार? जाणून घ्या.

कुठे होणार सामना?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा सामना आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.

केव्हा होणार सामना?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना आज (९ ऑक्टोबर) होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.

कुठे पाहता येणार लाईव्ह?

भारत आणि बांगलादेश यांच्यात होणारा सामना स्पोर्ट्स १८ वर लाईव्ह पाहता येईल.

इथे पाहा फुकटात

भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना जिओ सिनेमावर फुकटात पाहता येणार आहे.

असे आहेत दोन्ही संघ :

भारत- सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयांक यादव, तिलक वर्मा.

बांगलादेश- नजमुल हुसैन शान्तो (कप्तान), तंज़ीद हसन तमीम, परवेज़ हुसैन इमोन, तौहीद हृदयोय, महमूद उल्लाह, लिट्टन कुमेर दास, जेकर अली अनिक, मेहदी हसन मिराज, शक महेदी हसन, रिशाद हुसैन, मुस्तफिजुर रहमान, तस्कीन अहमद, शोरिफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब, रकीबुल हसन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : 'दादा बारामतीतून तुम्हीच लढा'; अजित पवारांना कार्यकर्त्यांचा आग्रह, नेमकं काय राजकारण शिजतंय? वाचा

Pankaja Munde : दसरा मेळाव्यात राजकीय संघर्षाबाबत पंकजा मुंडे काय बोलणार?

IND vs BAN, 2nd T2OI: टीम इंडियाच्या विजयाची सप्तमी! बांगलादेशला नमवत मालिकेत घेतली २-० ची विजयी आघाडी

News Policy For School Teachers : गाढव, घुबड आणि उंट...! विद्यार्थ्यांना टोमणे देणे होणार बंद, शिक्षकांच्या संतापावर मर्यादा

Delhi Politics: PWD कडून मुख्यमंत्री आवास सील; सीएम आतिशी यांच्या वस्तू काढल्या घराबाहेर , काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT