Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये प्रसिद्ध कीर्तनकारला घरात घुसून बेदम मारहाण; धक्कादायक कारण समोर

Chhatrapati Sambhajinagar Wadekar Maharaj News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादग्रस्त वक्तव्यावरून कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर यांच्यावर घरात घुसून मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
Chhatrapati Sambhajinagar Wadekar Maharaj News
Chhatrapati Sambhajinagar Wadekar Maharaj NewsSaam Tv
Published On
Summary
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धक्कादायक मारहाणीची घटना

  • कीर्तनातील वादग्रस्त वक्तव्यामुळे संतप्त जमावाचा हल्ला

  • कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर यांना घरात घुसून मारहाण

  • घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले

  • पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू

माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Nivrutti Maharaj Wadekar छत्रपती संभाजीनगरमध्ये किर्तनात केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याच्या रागातून एका किर्तनकाराला घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर कीर्तनकार हा छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गांधिली गावात राहणारा आहे. काही दिवसांपूर्वीच चंद्रग्रहण लागले होते. या चंद्रग्रहणादरम्यान सांगलीमधील एका गरोदर महिलेने पालेभाज्या, फळे चिरून खात या सर्व अंधश्रद्धा असल्याचा संदेश दिला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यावरुनच बोलताना निवृत्ती महाराजांनी टीका केली होती.

Chhatrapati Sambhajinagar Wadekar Maharaj News
Viral Video : भयंकर संताप! ग्राहकांच्या जीवाशी खेळ, मासे विक्रेत्यानं फवारले झुरळ मारण्याचं औषधं, व्हिडिओ पाहून संताप अनावर होईल

या टीकेमुळे काही जण संतप्त झाले. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी जमाव करून कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. या वेळी घरात त्यांचे कुटुंब उपस्थित होते. मारहाणीच्या गोंधळात त्यांनाही धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Wadekar Maharaj News
Maternity Leave : कोणताही नियम महिलेला मातृत्व रजा घेण्यापासून रोखू शकत नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मारहाणीनंतर महाराजांनी व्हिडिओद्वारे जाहीर माफीही मागितली. माझ्याकडून चुकून वादग्रस्त वक्तव्य बोलले गेले, त्याबद्दल मी माफी मागतो, मात्र माझ्या कुटुंबावर, माझ्यावर अशाप्रकारे हल्ला करणे योग्य नाही. कायदेशीर कारवाई करायला हवी होती, असं ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com