india vs australia 5 test match series schedule border gavaskar trophy time table cricket news in marathi amd2000 yandex
Sports

IND vs AUS Test Series: IPL सुरु असताना भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचं वेळापत्रक जाहीर! या मैदानांवर रंगणार सामने

Border Gavaskar Trophy Schedule: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिला सामना २२ नोव्हेंबर रोजी रंगणार आहे.

Ankush Dhavre

IND vs AUS, Border Gavaskar Trophy Schedule:

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिला सामना २२ नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. हा सामना पर्थच्या मैदानावर रंगणार आहे. भारतीय संघाने पहिल्यांदाच आपल्या कसोटी मालिकेची सुरुवात पर्थ कसोटीने करणार आहे.

यावेळी देखील कसोटी मालिकेत डे- नाईट कसोटी सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे.६ ते १० डिसेंबर रोजी अॅडिलेडमध्ये हा डे-नाईट सामना रंगणार आहे. तर बॉक्सिंग डे कसोटी सामना आणि वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या सामन्यांच्या मैदानांमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. मालिकेतील तिसरा कसोटी सामना गाबामध्ये रंगणार आहे. तर मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्न आणि शेवटचा कसोटी सामना ३ ते ७ जानेवारीदरम्यान सिडनीच्या मैदानावर रंगणार आहे.

असा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड...

भारतीय संघाने गेल्या दोन्ही कसोटी मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन पराभूत केलं आहे. या दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला, तर हे दोन्ही संघ १०७ सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यादरम्यान ऑस्ट्रेलियाने ४५ सामने जिंकले आहेत. तर ३२ सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली असू २९ सामने ड्रॉ आणि एक सामना बरोबरीत सुटला होता. (Cricket news in marathi)

असं आहे भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक...(IND vs AUS Test Series Schedule)

पहिला कसोटी सामना- २२ ते २६ नोव्हेंबर, पर्थ

दुसरा कसोटी सामना - ६ ते १० डिसेंबर,अॅडिलेड

तिसरा कसोटी सामना - १४ ते १८ डिसेंबर, ब्रिसबेन, गाबा

चौथा कसोटी सामना - २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न

पाचवा कसोटी सामना - ३ ते ७ जानेवारी २०२५, सिडनी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips 2026: 'कपडे मोठे पण दिसाल स्टायलिश', हे आहेत 5 ट्रेडिंग ओव्हरसाईज्ड कपडे पॅटर्न

Maharashtra Live News Update : चंद्रकांत पाटलांकडून उमेदवारांच्या प्रचारार्थी मॅरेथॉन बैठका

शेवटची तारीख उलटून गेली, अजूनही HSRP नंबरप्लेट बसवली नाही तर काय होणार? वाचा

'धुरंधर'चा खेळ संपला; बॉक्स ऑफिसवर The Raja Saabचं तुफान, प्रभासच्या चित्रपटानं पहिल्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

Pune : 'त्या' क्लबच्या मद्यपरवाना निलंबनावर स्थगिती, उच्च न्यायालयाने काय घेतला निर्णय?

SCROLL FOR NEXT