आयपीएल २०२४ स्पर्धेतील सहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने ४ चेंडू शिल्लक ठेऊन ४ गडी राखून विजय मिळवला.
या सामन्यात विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली. हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा या हंगामातील पहिलाच विजय आहे. या सामन्यात शानदार खेळी करणाऱ्या विराट कोहलीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. या सामन्यानंतर विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
विराट कोहलीचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. विराटची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान काही चाहते सुरक्षारक्षकांना चकवत थेट मैदानात प्रवेश करत असतात. असाच काहीसा प्रकार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान पाहायला मिळाला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा सामना सुरु असताना एक क्रिकेट फॅनने सुरक्षारक्षकांना चकवा देत थेट खेळपट्टीच्या दिशेने धाव घेतली. खेळपट्टीवर गेल्यानंतर तो विराटचे पाय पडू लागला. त्यानंतर त्याने विराटला मिठी मारली. मात्र काही क्षणातच सुरक्षारक्षक मैदानात आले आणि त्याला मैदानाबाहेर घेऊन गेले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या घटनेनंतर पुन्हा एकदा खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. फॅनने सुरक्षारक्षकांना चकवा देत मैदानात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. (Cricket news in marathi)
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २० षटक अखेर ६ गडी बाद १७६ धावा केल्या. पंजाबकडून फलंदाजी करताना शिखर धवनने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ४ गडी राखून विजय मिळवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.