भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील टी२० मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताने झिम्बॉब्वेचा पराभव केला. भारताने फलंदाजी करताना पाकिस्तानचा एक रेकॉर्ड मोडलाय. झिम्बॉब्वेनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं २०ओव्हरमध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध ६ विकेटवर १६७ धावा केल्या. भारताच्या डावाची सुरुवात यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल या दोघांनी केली.
सिकंदर रझानं झिम्बॉब्वेच्या डावाची पहिली ओव्हर टाकली. याच ओव्हरमध्ये यशस्वी जयस्वालच्या खेळीमुळं भारतानं पाकिस्तानच्या नावावर असलेला एक रेकॉर्ड मोडला. भारतानं डावाच्या पहिल्याच बॉलवर १३ धावा केल्या. यापूर्वी पाकिस्ताननं पहिल्या बॉलवर १० धावा केल्या होत्या. कर्णधार सिकंदर रझानं झिम्बॉब्वेच्या डावाची पहिली ओव्हर टाकली. सिकंदर रझानं पहिला बॉल नो टाकला. या बॉलवर जयस्वालनं षटकार मारला.
भारताला नो बॉलची एक रन मिळाल्यानं ७ धावा झाल्या. दुसरा बॉल फ्री हिट मिळाल्यानं यशस्वी जयस्वालनं षटकार मारला. यामुळं भारताच्या नावावर १ बॉलवर १३ धावा झाल्या. यशस्वी जयस्वालचे दोन षटकाराच्या जोरावर भारतानं पाकिस्तानचा विक्रम मोडला. पाकिस्तानच्या नावावर पहिल्या बॉलवर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम होता. पाकिस्तानच्या संघाने एका बॉलवर १० धावा होत्या. पाकिस्ताननं श्रीलंकेविरुद्ध २०२२ मध्ये पहिल्या बॉलवर १० धावा केल्या होत्या. तर न्यूझीलंडनं पहिल्या बॉलवर पाकिस्तान विरुद्ध ९ धावा केल्या होत्या. नेपाळनं देखील भूतानच्या विरुद्ध ९ धावा केल्या होत्या.
यशस्वी जयस्वालनं डावाची सुरुवात आक्रमक केली होती. सलग दोन षटकार मारल्यानंतर सिकंदर रझाला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात यशस्वी बाद झाला. त्यानंतर मैदानावर आलेल्या अभिषेक शर्मालाही मोठी खेळी करता आला नाही. मात्र संजू सॅमसनने अर्धशतक करत झिम्बाब्वेच्या संघासमोर १६७ धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाव्बेचा संघ १२५ धावांत बाद झाला. शुबमन गिलने आपल्या नेतृत्त्वात पहिली मालिका जिंकली. झिम्बाब्वेने मालिकेची सुरुवात विजयाने केली. त्यांनी पहिला सामना १६ धावांनी जिंकला होता,परंतु त्यानंतर भारतीय संघाने सर्व सामने जिंकलेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.