IND vs ZIM: झिम्बाब्वे संघाचा दारुण पराभव; टीम इंडियाने ४-१ ने जिंकली मालिका

IND vs ZIM: भारतीय संघाने झिम्बाब्वेला टी-२० मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात पराभूत करून विजय मिळवला. यासोबतच शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने ही मालिका ४-१ ने जिंकली.
IND vs ZIM: झिम्बाब्वे संघाचा दारुण पराभव; टीम इंडियाने ४-१ ने जिंकली मालिका
IND vs ZIM
Published On

भारतीय संघाने झिम्बाब्वेला टी-२० मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात पराभूत करून विजय मिळवला. यासोबतच शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने ही मालिका ४-१ ने जिंकली. भारतीय संघाने झिम्बाब्वेला टी-२० मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात पराभूत करून विजय मिळवला. यासोबतच शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने ही मालिका ४-१ ने जिंकली.

झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा मालिकेतील ४ सामन्यांमध्ये सतत नाणेफेक हरला होता. या सामन्यात मात्र त्याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकात सिंकदर रझाने यशस्वी जयस्वालची विकेट घेतली. त्यानंतर स्फोटक फलंदाजी करणारा अभिषेक शर्माही मोठी खेळी यावेळी करू शकला नाही. मात्र संजू सॅमसनने अर्धशतक करत झिम्बाब्वेच्या संघासमोर १६७ धावांचा डोंगर उभारला.

हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या अखेरच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १६७ धावा केल्या. आपल्या डावात संजू सॅमसनने अर्धशतक करत ५८ धावा चोपल्या. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचे फलंदाज भांबवले होते. भारतीय गोलंदाजांसमोर झिम्बाब्वेचे संघाने नांगी टाकली होती. त्यामुळे संपूर्ण संघ केवळ १२५ धावांत गडगडला.

शुबमन गिलने कर्णधारपदाखाली पहिली मालिका जिंकली. दरम्यान हा सामना जिंकून झिम्बाब्वेचा संघ आपली लाज वाचवण्याचा प्रयत्नात होता, परंतु भारताने त्यांचा पराभव केला. झिम्बाब्वेने मालिकेची सुरुवात विजयाने केली. त्यांनी पहिला सामना १६ धावांनी जिंकला, पण यानंतर शुबमन गिलच्या खेळाडूंनी शानदार पुनरागमन करत मालिका जिंकून जिंकली.

गेल्या आठवडाभरात युवा खेळाडूंच्या संघाने ज्या पद्धतीने कामगिरी केली, ते पाहता हरारे येथे ६ जुलै रोजी झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यातील धक्कादायक पराभवाचं दुःख पूर्णपणे दूर केलंय. मात्र हा पराभव निश्चितच संघासाठी वेक-अप कॉल ठरला आणि त्याचा परिणाम पुढील ४ सामन्यांमध्ये दिसून आला. जवळपास प्रत्येक सामन्यात वेगवेगळ्या खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवून मालिका ४-१ अशी जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

IND vs ZIM: झिम्बाब्वे संघाचा दारुण पराभव; टीम इंडियाने ४-१ ने जिंकली मालिका
Delhi Capital Head Coach: दिल्ली कॅपिटल्सच्या हेड कोच पदावरुन रिकी पाँटिंगला हटवलं, नवा मुख्य प्रशिक्षक कोण? सौरव गांगुलीने सांगून टाकलं!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com