ICC Champions Trophy 2025: भारत- पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली! समोर आलं चॅम्पियन्स ट्रॉफीचं संपूर्ण वेळापत्रक

IND vs PAK Match Dates, Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा थरार पाकिस्तानमध्ये रंगणार आहे.
ICC Champions Trophy 2025: भारत- पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली! समोर आलं चॅम्पियन्स ट्रॉफीचं संपूर्ण वेळापत्रक
ind vs pak yandex
Published On

अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये झालेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपदाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत करत दुसऱ्यांदा ही ट्रॉफी उंचावली. दरम्यान भारतीय संघाचं संपूर्ण लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफीवर असणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे असणार आहे. दरम्यान बीसीसीआयने आधीच स्पष्ट केलं आहे की, भारतीय संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही. तर दुसरीकडे पाकिस्तानने या स्पर्धेसाठी जोरदार तयारी करायला सुरुवात केली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने वेळापत्रक तयार केलं असून सर्व क्रिकेट बोर्डकडे मंजूरीसाठी पाठवलं आहे. सर्व क्रिकेट बोर्डने हिरवं कंदील दाखवल्यानंतर हे वेळापत्रक अधिकृतरित्या प्रसिद्ध केलं जाईल. मात्र याआधीच हे वेळापत्रक व्हायरल झालं आहे. टेलिग्राफने आपल्या वृत्तपत्रात वेळापत्रकाबाबत खुलासा केला आहे. यानुसार चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील सलामीची लढत यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

ICC Champions Trophy 2025: भारत- पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली! समोर आलं चॅम्पियन्स ट्रॉफीचं संपूर्ण वेळापत्रक
IND vs ZIM: दुसरा सामना जिंकूनही शुभमन गिलची डोकेदुखी वाढली! समोर आलं मोठं कारण

या स्पर्धेत एकूण ८ संघ खेळताना दिसून येणार आहेत. ज्यात भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि बांगलादेश एकाच गटात असणार आहेत. तर ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ एका गटात असणार आहेत. या स्पर्धेत भारतीय संघाचे सर्व सामने लाहोरमध्ये होणार आहे. या स्पर्धेतील भारतीय संघाचा पहिला सामना २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. तर २३ फेब्रुवारी रोजी भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. तर साखळी फेरीतील शेवटचा सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये १ मार्च रोजी होईल.

ICC Champions Trophy 2025: भारत- पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली! समोर आलं चॅम्पियन्स ट्रॉफीचं संपूर्ण वेळापत्रक
IND vs SL: श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतूनही रोहित अन् विराटला ब्रेक! कोण होणार टीम इंडियाचा कर्णधार?

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील सेमिफायनलचे सामने रावलपिंडीमध्ये होणार आहेत. मात्र भारतीय संघाने जर स्पर्धेतील टॉप ४ मध्ये प्रवेश केला, तर भारतीय संघाचे हे सामने लाहोरमध्ये खेळवले जातील. पाकिस्तानने हे वेळापत्रक तयार केलं असलं, तरीदेखील भारतीय संघ पाकिस्तानात जाऊन खेळणार की नाही याबाबत बीसीसीआयकडून कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com