India Vs West Indies Test  x
Sports

IND Vs WI Test : वेस्ट इंडिजच्या शेपटाने भारताला झुंजवले! कॅम्बेल, होप यांच्या शतकानंतर १० व्या विकेटच्या जोडीने रडवले

IND Vs WI 2nd Test : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्ली अरुण जेटली स्टेडियम मध्ये रंगला आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला १२१ धावा कराव्या लागणार आहेत.

Yash Shirke

  • भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दुसरा कसोटी सामना

  • फॉलऑननंतर वेस्ट इंडियन संघाचे कमबॅक

  • भारतीय संघाला विजयासाठी इतक्या धावांचे आव्हान

India Vs West Indies Test : दिल्लीच्या अरूण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा कसोटी मालिकेतील दुसरा सामना रंगला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५ गडी गमावत ५१८ धावा केल्या. त्यानंतर वेस्ट इंडियन संघ फलंदाजीला आला आणि २४८ धावांवर संघ सर्वबाद झाला. फॉलऑननंतर पुन्हा फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडियन खेळाडूंनी कमबॅक करत ३०० धावा केल्या. आता भारताला कसोटी जिंकण्यासाठी १२१ धावा कराव्या लागणार आहेत.

भारताचा कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकत गोलंदाजी करण्यासाठी वेस्ट इंडियन संघाला आमंत्रित केले. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल ही सलामीची जोडी मैदानात उतरली. राहुल ३८ धावांवर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या साई सुदर्शनने ८७ धावांची खेळी केली. यादरम्यान दुसऱ्या बाजूला यशस्वी जैस्वालने धावांचा डोंगर उभा केला.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांच्यात भागीदारी सुरु झाली. तेव्हा यशस्वी जैस्वाल १७५ धावांवर बाद झाला. द्विशतक करण्याचे त्याचे स्वप्न भंगले. जैस्वाल बाद झाल्यानंतर नितीश कुमार रेड्डी फलंदाजीला आला, त्याने ४३ धावा केल्या. ध्रुव जुरेलने ४४ धावांचे योगदान दिले. कर्णधार शुभमन गिलने नाबाद १२९ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून जोमेल वॉरिकनने ३ विकेट्स घेतल्या आणि रोस्टन चेसने १ विकेट घेतली.

भारताने ५१८ धावा केल्यानंतर वेस्ट इंडियन खेळाडू फलंदाजीला आले. संघ २४८ धावांवर सर्वबाद झाला. अलिक अथानाझेने सर्वाधिक ४१ धावा केल्या. टॅगेनारिन चंद्रपॉलने ३४ धावा आणि शाई होपने ३६ धावा केल्या. डावात भारतीय गोलंदाज वेस्ट इंडियन फलंदाजांवर भारी ठरले. कुलदीप यादवने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजाने ३ गडी बाद केले. या व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या. फॉलोऑनच्या घोषणेनंतर लगेच वेस्ट इंडियन खेळाडू फलंदाजीला आले.

दुसऱ्यांदा फलंदाजी करताना वेस्ट इंडियन खेळाडूंनी कमबॅक केले. सलामीवीर जॉन कॅम्पबेलने ११५ धावांची दमदार खेळी केली. शाई होपने देखील चांगली कामगिरी करत शतक पूर्ण केले. याशिवाय कर्णधार रोस्टन चेसने देखील ४० धावांचे योगदान दिले. या डावात वेस्ट इंडियन खेळाडू भारतावर वरचढ ठरले. भारताकडून कुलदीप यादवने ३ विकेट्स, मोहम्मद सिराजने २ विकेट्स, जसप्रीत बुमराहने २ विकेट्स, वॉशिंग्टन सुंदरने १ विकेट आणि रवींद्र जडेजाने १ विकेट घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Bonus: राज्यातील 'या' सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची धनधन दिवाळी; मिळाला २० वर्षातील सर्वाधिक बोनस

Crime : काम देतो म्हणत नेलं, सामूहिक अत्याचारानंतर बेदम मारलं; अमानुष छळामुळे आदिवासी महिलेचा मृत्यू

Sharad Pawar: निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांनी नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र दिला? बघा VIDEO

Tuesday Horoscope : आनंदी आनंद होणार, आयुष्यात सुंदर घटना घडतील; ५ राशींच्या लोकांचे नशीब चमकणार

Face Care: चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि पिंपल्स कमी करुन नॅचरल सोफ्ट ग्लोईंग चेहरा पाहिजे; मग 'हे' घरगुती फेसपॅक नक्की लावा

SCROLL FOR NEXT