IND vs AUS : एलिसा हीलीची खेळी ठरली निर्णायक; रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली

INDW vs AUSW : आजच्या सामन्यात एलिसा हीलीची खेळी ठरली निर्णायक ठरली. रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली आहे.
INDW vs AUSW
INDW vs AUSW Saam tv
Published On
Summary

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील सामना ठरला अटीतटीचा

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी केली चांगली कामगिरी

सामन्यात अंतिम क्षणी भारताचा पराभव

महिला वनडे विश्वचषक स्पर्धेत रविवारी झालेला भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सामना अत्यंत रोमहर्षक ठरला. या सामन्यात दोन्ही संघांनी खेळाची जबरदस्त झलक दाखवली. मात्र शेवटच्या क्षणी सामना फिरल्याने भारताला पराभव स्वीकारावा लागला. या अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला धूळ चारली.

INDW vs AUSW
Gopichand Padalkar : अहिल्यानगर शहराचं नामांतरण ज्यांना मान्य नाही, त्यांच्यावर कारवाई करा; पडळकरांची मागणी

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर प्रथम फलंदाजीचं आमंत्रण मिळाल्यानंतर भारताकडून स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांनी दमदार सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी १५५ धावांची भागीदारी रचली. या डावात मंधाना ८० धावा करुन बाद झाली. तर प्रतिका रावल ७५ धावा करुन बाद झाली. दोन्ही सलामीवर बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांनी धावसंख्या ३०० पार नेली. टीम इंडियाने ४८.५ षटकांत ऑस्ट्रेलियाला ३३१ धावांचं आव्हान दिलं होतं.

INDW vs AUSW
Gopichand Padalkar : अहिल्यानगर शहराचं नामांतरण ज्यांना मान्य नाही, त्यांच्यावर कारवाई करा; पडळकरांची मागणी

या सामन्यात हरलीन देओल ३८ धावा, कर्णधार हरनप्रीत २२ धावा, जेमिमा रोड्रिग्स आणि ऋचा घोषने प्रत्येकी ३२-३२ धावा केल्या. या सामन्यात एनाबेल सदरलँडने चांगली कामगिरी केली. एनाबेलने पाच गडी बाद केले. टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ४९ षटकात ७ गडी गमावून ३३१ धावा कुटल्या. महिला वनडे वर्ल्डकपच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठी धावसंसख्या चेज केली आहे.

INDW vs AUSW
BF Kills GF : गर्लफ्रेंडचा मोबाईलमध्ये आढळला दुसऱ्यासोबत नग्न फोटो; बॉयफ्रेंडची सटकली, केक कापलेल्या चाकूने गळा चिरला

भारताने या स्पर्धेत ४ सामने खेळले आहेत. त्यातील पहिले दोन सामने जिंकले आहेत. मात्र नंतरच्या सलग दोन सामन्यात टीम इंडिया पराभूत झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या आधी दक्षिण आफ्रिकेने भारताला पराभूत केलं होतं. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाला २ गुण मिळाले आहेत. ऑस्ट्रेलियाचे एकूण ७ गुण झाले आहेत. तर भारताचे ४ गुण झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com