IND vs WI: 'आय लव्ह यू शुभमन', मिस्ट्री गर्लने लाईव्ह मॅचमध्ये केला शुभमन गिलला प्रपोज, फोटो व्हायरल

Mystery Girl Proposes Shubman Gill: वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने दमदार शतक झळकावले. यादरम्यान,लाईव्ह सामन्यामध्ये शुभमन गिलला खास व्यक्तीने प्रपोज केले. हा प्रपोजल सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Mystery Girl Proposes Shubman Gill
Shubman Gillsaam tv
Published On

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ५ विकेट गमावून ५१८ धावा केल्या आणि डाव घोषित केला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गिलने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १० वे शतक झळकावले. यशस्वीसोबतच्या भागीदारीदरम्यान, प्रेक्षकांची प्रतिक्रिया टीव्हीवर पाहायला मिळाली. या प्रतिक्रियेपेक्षा एका खास व्यक्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एका मिस्ट्री गर्लने शुभमन गिलला सामना दरम्यानच प्रपोज केले. हा प्रपोजल सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

मिस्ट्री गर्लने केला शुभमन गिलला प्रपोज

भारताच्या पहिल्या डावात, शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल संघासाठी महत्वपूर्ण भागीदारी करत होते. यादरम्यान, स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांमध्ये एका मुलीने खास पोस्टर दाखवला, जो कॅमेऱ्यात कैद झाला. पोस्टवर लिहिले होते की, आय लव्ह यू शुभमन. यानंतर, त्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. काही मिनिटांतच सोशल मीडियावर #ILoveYouShubman हॅशटॅग वापरणाऱ्या पोस्ट आणि मीम्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली. कसोटी आणि वनडे संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाल्यापासून शुभमन गिलची फॅन फॉलोइंग वाढली आहे.

mystery girl
Shubman Gillgoogle

लव्ह लाइफवर शुभमन गिलचा खुलासा

काही दिवसांपूर्वी शुभमन गिलने आपल्या लव्ह लाइफबद्दल खुलासा केला होता. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या इंटरव्हयूमध्ये शुभमन म्हणाला की, माझ्याबद्दल इतक्या अफवा पसवल्या जातात की, मला वेगवेगळ्या लोकांशी जोडले जाते. कधीकधी त्या इतक्या विचित्र असतात की मी त्या व्यक्तीला कधीच पाहिलेले नसते किंवा ओळखतही नसतो. तरीही, मला सतत ऐकायला मिळते की मी त्यांच्यासोबत आहे.

Mystery Girl Proposes Shubman Gill
IND Vs AUS: ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे आणि टी-२० सीरीजसाठी हार्दिकला वगळलं, नेमकं कारण काय?

गिलने मोडला रोहित शर्माचा विक्रम

सामन्याच्या पहिल्या डावात चमकदार कामगिरी करत शुभमन गिलने १९६ चेंडूमध्ये १२९ नाबाद धावा केल्या. हा गिलचा कर्णधार म्हणून ५ वा तर कसोटी क्रिकेटमधील १० वा शतक होता. त्याने भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करणाऱ्या रोहित शर्माला मागे टाकले आणि एमएस धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली.

Mystery Girl Proposes Shubman Gill
IND vs AUS: विराट-रोहितचा युग संपला, २०२७ चा वर्ल्डकप खेळणार नाही? कुणी दिले संकेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com