
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज शनिवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वनडे आणि टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. शुभमन गिलला एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले तर श्रेयस अय्यरला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. एकीकडे, रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट आणि टी- २० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले.
तर दुसरीकडे, भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला संघातून वगळण्यात आले आहे. आशिया कपमध्ये पंड्या विशेष प्रभावी ठरला नाही. आशिया कपच्या ६ सामन्यांमध्ये पंड्याने १२०च्या स्ट्राइक रेटने ४८ धावा केल्या आणि ४ विकेट्स घेतले. हार्दिक पंड्याची संघात निवड का केली नाही, याचे कारण आता समोर आले आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी हार्दिक पंड्याला का घेतलं नाही?
आशिया कप २०२५ च्या श्रीलंकेविरुद्धच्या सुपर फोर सामन्यादरम्यान पंड्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे पंड्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात निवड करण्यात आली नाही. हार्दिक पंड्याला क्वाड्रिसेप्स दुखापत झाली आहे. यामुळे तो २८ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध आशिया कपच्या अंतिम सामन्यात खेळू शकला नाही. त्याच्या जागी रिंगू सिंगला संघात खेळवण्यात आले होते.
वृत्तानुसार, हार्दिक पंड्याला चार आठवडे आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हार्दिक पंड्याच्या दुखापतीबाबत बोलताना बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले की, तो अजून पूर्णपणे फिट नाही आहे, पुढच्या आठवड्यात बंगळुरु येथील सेंटर ऑफ एक्सलेंन्स येथे रिहाबसाठी येईल. हार्दिक पंड्याच्या दुखापतीवर बीसीसीआयची मेडिकल टीम अहवाल सादर करेल.
भारत विरु्द्ध ऑस्ट्रेलिया सीरीजचे वेळापत्रक
१९ ऑक्टोबर २०२५ पासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना पर्थ येथे खेळला जाईल. तर, दुसरा सामना २३ ऑक्टोबरला एडिलेटमध्ये खेळला जाईल. तिसरा सामना २५ ऑक्टोबर रोजी सिडनी येथे खेळवला जाणार आहे. यानंतर, ५ सामन्यांच्या टी- २० मालिकेचा थरार सुरु होणार आहे. २९ ऑक्टोबरपासून सुरु होणारी ही मालिका ८ नोव्हेंबर रोजी संपेल. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताचे माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा पुन्हा एकदा मैदानावर दिसणार आहेत.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जायस्वाल, ध्रुव जुरेल (विकेटकिपर),
टी २० मालिकेसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक सर्मा, शुबमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), वरूण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकु सिंह, वॉशिंग्टन सुंदर (विकेटकीपर),
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.