
आशिया कपच्या हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. तिलक वर्माच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारत नवव्यांदा आशिया कपवर आपले नाव कोरले. सामन्यानंतर, मॅच सेरेमनीमध्ये फुल ऑन ड्रामा पाहायला मिळाला. भारतीय संघाने एसीसी प्रमुख आणि पीसीबी चेयरमन मोहसिन नकवीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यानंतर मोहसिन नकवी हे खेळाडूंची पदके आणि आशिया कपची ट्रॉफी घेऊन आपल्या हॉटेल रुमवर परतले. या संपूर्ण प्रकरणावर आता बीसीसीआयची प्रतिक्रिया समोर आली आहे. बीसीसीआयने या संपूर्ण घटनेचा तीव्र विरोध केला आहे.
टीम इंडियाचा मोहसिन नकवीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार
आशिया कप फायनच्या प्रेजेंटेशन सेरेमनीमध्ये मोहसिन नकवी स्टेजवर उपस्थित होते. परंतु, बीसीसीआयने मोहसिन नकवीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्याऐवजी एमिरेट्स क्रिकेट बोर्डाच्या उपाध्यक्षांकडून ट्रॉफी स्वीकारु असे बीसीआयने सांगितले. यानंतर, नाराज होऊन मोहसिन नकवी यांनी आशिया कपची ट्रॉफी आणि टीम इंडियाच्या खेळाडूंची पदकं घेऊन ते हॉटेलमध्ये परतले. रिपोर्टनुसार, ते म्हणाले, भारतीय खेळाडूंना ट्रॉफी देण्याची काही गरज नाही.
बीसीसीआय अॅक्शन मोडमध्ये
आशियाई क्रिकेट परिषद आणि पीसीबीचे चेयरमन मोहसिन नकवीच्या कृत्यावर बीसीसीआय अॅक्शन घेण्याच्या पूर्ण तयारीत आहे. त्याआधी, बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी नकवी यांना फटकारले आणि भारतीय संघाने त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार का दिला याचे कारण स्पष्ट केले.देवजीत सैकिया म्हणाले, एसीसी अध्यक्ष ज्या देशाचे आहेत त्या देशाशी भारताचे युद्ध सुरू आहे. ज्या देशाने आपल्याशी युद्ध केले आहे त्या देशाच्या प्रतिनिधीकडून आपण ट्रॉफी स्वीकारू शकत नाही. म्हणूनच आम्ही ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.
देवजीत सैकिया पुढे म्हणाले की, बीसीसीआय पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत या प्रकरणाची औपचारिक तक्रार दाखल करेल. त्यांनी शक्य तितक्या लवकर भारताला ट्रॉफी परत करण्याचे अल्टिमेटम देखील दिले. देवजीत सैकिया यांनी मोहसिन नक्वीच्या वर्तनावर कारवाई करण्याची मागणी केली.
पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर बीसीसीआय सचिवांनी काय म्हटले?
पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले की, "आम्ही पंतप्रधानांचे ट्विट पाहिले. याचा आम्हाला खूप आनंद आहे. आधी ऑपरेशन सिंदूर आणि आता ऑपरेशन तिलक. शत्रू देशातील काही लोकांनी केलेल्या कृत्याला हे योग्य उत्तर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.