IND W vs SL W: ना स्मृती मंधाना, ना हरमनप्रीत कौर; पण दिप्ती, अमनज्योत चमकल्या; वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात भारतानं श्रीलंकेला चारली धूळ

India beat Sri lanka In World Cup First Match: आयसीसी वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात भारताने श्रीलंकेचा ५९ धावांनी पराभव केला. हा सामना गुवाहाटी स्टेडियमवर खेळला गेला.
IND vs SL
IND vs SLgoogle
Published On

३० सप्टेंबरपासून आयसीसी महिला वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेला सुरुवात झाली. पहिलाच सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. हा सामना गुवाहाटीमधील एसीए स्टेडियमवर खेळवण्यात आला. सामनादरम्यान पाऊस आल्याने डीलएस नियम लागू करण्यात आला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेला ४७ ओव्हरमध्ये २६९ धावांचे लक्ष्य दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ ४५.४ ओव्हरमध्ये २११ धावांवर सर्वबाद झाला. भारताने हा सामना ५९ धावांनी जिंकला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दमदार कामगिरीच्या जोरावर पहिलाच सामना जिंकून वर्ल्डकपची सुरुवात विजयाने केली.

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची धमाकेदार सुरुवात

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मानधना फक्त १० चेंडूत ८ धावा करुन तंबूत परतली. त्यानंतर प्रतिका रावल आणि हरलीन देओलने संयमी खेळी खेळली. प्रतिका रावलने ३७ धावा, हरलीन देओलने ४८ धावांची खेळी खेळली तर दीप्ती शर्माने ५३ धावा करत दमदार अर्धशतक झळकावले.

IND vs SL
IND vs Pak: ट्रॉफी आणि पदकं चोरल्यानंतर बीसीसीआयने काढली पाकिस्तानची लाज; कारवाई होणार

अमनजोत कौर आणि स्नेह राणा यांनी संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना कौरने ५६ चेंडूत ५७ धावांची महत्वपूर्ण खेळी खेळली. नवव्या क्रमांकावर फलंदाज स्नेह राणाने १५ चेंडूत २८ धावांची छोटी पण स्फोटक खेळी केली, ज्यामुळे भारताला २६९ धावांचा मोठा टप्पा गाठता आला

श्रीलंकेला पहिल्याच सामन्याची चारली धूळ

भारताने श्रीलंकेला ४७ ओव्हरमध्ये २६९ धावांचे लक्ष्य दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने धमाकेदार सुरुवात केली. श्रीलंकेच्या सलामीवर जोडीने ३० धावांची पार्टनरशिप केली. श्रीलंकेकडून चमारी अट्टापट्टूने सर्वाधिक ४३ धावा केल्या तर नीलाक्षी डी सिल्वाने ३५ धावा केल्या. एकावेळी श्रीलंकेचा २ विके्टस गमावून १३० धावांवर फलंदाजी करत होता. परंतु, भारतीय संघाच्या गोलंदाजांनी कमबॅक करत फलंदाजाना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या २११ धावांमध्ये माघारी परतला. भारताकडून दिप्ती शर्माने १० ओव्हरमध्ये ५४ धावा खर्च करत सर्वाधिक ३ विकेट्स घेतले. स्नेह राणा आणि श्री- चरणीने प्रत्येकी २ विकेट घेत संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. याशिवाय, क्रांति गौड, अमनजोत कौर, आणि प्रतिका रावलने प्रत्येकी १ विकेट घेतला.

IND vs SL
Vaibhav Suryavanshi Century : १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची कमाल; ऑस्ट्रेलियात तडाखेबंद शतक ठोकून रचला इतिहास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com