IND vs AUS: विराट-रोहितचा युग संपला, २०२७ चा वर्ल्डकप खेळणार नाही? कुणी दिले संकेत

Virat Kohli Rohit Sharma Wont Play 2027 World Cup: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. विराट कोहली आणि रोहित शर्माचा संघात समावेश करण्यात आला आहे. परंतु, विराट कोहली आणि शर्माच्या वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबाबात अजित आगरकरने मोठे विधान केले आहे.
virat kohli rohit sharma
virat kohli rohit sharma google
Published On

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा संघात समावेश करण्यात आला आहे. २०२७ चा वर्ल्ड कप लक्षात घेऊन संघाची कमान रोहित शर्माच्या जागी शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. १९ ऑक्टोबरपासून सुरू होणारी ही मालिका ८ नोव्हेंबर रोजी संपेल.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे अनुभवी फलंदाज आता गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसतील. यासोबत, २०२७ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माच्या खेळण्याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. याबाबत, बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकरने पत्रकार परिषदेत मोठे विधान केले आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली २०२७चा वर्ल्डकप खेळणार?

बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे आणि टी- २० संघाची घोषणा केली. पत्रकार परिषदेत अजित आगरकर यांना विराट कोहली आणि रोहित शर्मा २०२७चा वर्ल्डकप खेळणार का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर, अजित आगरकरने उत्तर दिले की, 'रोहित आणि विराट दोघेही सध्या यावर भाष्य करू इच्छित नाहीत.' मार्चमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर हे दोन्ही खेळाडू पहिल्यांदाच इंडियन जर्सीमध्ये खेळताना दिसतील. आगरकरच्या विधानानंतर, रोहित शर्मा आणि विराट कोहली २०२७ च्या वर्ल्डकप खेळताना दिसणार नाहीत अशी चर्चा सुरू झाली आहे.

virat kohli rohit sharma
IND Vs AUS: ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे आणि टी-२० सीरीजसाठी हार्दिकला वगळलं, नेमकं कारण काय?

७ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहित शर्मा आणि विराट कोहली सात महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करतील. दोन्ही खेळाडूंनी कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर, भारताची पुढील वनडे मालिका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर होईल आणि त्यानंतर जानेवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध आणखी एक मालिका होईल.

विराट आणि रोहितची निवृत्ती

२०२४ च्या टी-२० वर्ल्डकपनंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर रोहितने ७ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. पाच दिवसांनंतर, १२ मे रोजी विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

virat kohli rohit sharma
IND W vs SL W: ना स्मृती मंधाना, ना हरमनप्रीत कौर; पण दिप्ती, अमनज्योत चमकल्या; वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात भारतानं श्रीलंकेला चारली धूळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com