indian cricket team twitter
Sports

Super 8: USA ला नमवत टीम इंडियाची विजयाची हॅट्ट्रिक! सुपर ८ मध्ये या संघांसोबत होणार सामना

IND vs USA T20 CWC Updates: भारतीय संघाने अमेरिकेला नमवत सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान सुपर ८ मध्ये भारतीय संघाचा सामना कोणत्या संघाविरुद्ध होणार? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील २५ वा सामना भारत आणि अमेरिका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत ७ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने या स्पर्धेतील सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. सुपर ८ मध्ये भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार हे जवळजवळ निश्चित झालं आहे.

आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेबद्दल बोलायचं झालं, तर या स्पर्धेत एकूण २० संघांनी सहभाग घेतला आहे. या २० संघांना प्रत्येकी ४ गटात विभागलं गेलं आहे. प्रत्येक गटात ५ संघ आहेत. या ५ संघांना प्रत्येकी ४-४ सामने खेळण्याची संधी मिळाली. या ५ पैकी २ संघ सुपर ८ मध्ये प्रवेश करतील. भारतीय संघाचा अ गटात समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संघाचा पहिला सामना क गटातील अव्वल स्थानी असलेल्या संघासोबत होईल. त्यानंतर पुढील सामना ड गटातील दुसऱ्या स्थानी असलेल्या संघाविरुद्ध होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना २४ जून रोजी होऊ शकतो. त्यामुळे भारतीय संघाला २४ जून १९ नोव्हेंबरच्या पराभवाचा बदला घेण्याची संधी असणार आहे.

भारतीय संघाने अजूनही साखळी फेरीतील आपले सर्व सामने खेळलेले नाहीत. भारतीय संघाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध होणार आहे. हा सामना फ्लोरिडामध्ये होणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत आणि या तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडचा एकतर्फी पराभव केला. तर दुसरा सामना पाकिस्तानविरुद्ध रंगला. या सामन्यातही भारतीय संघाने बाजी मारली. तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने अमेरिकेला पराभूत करत सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg Tourism: सिंधुदूर्गात लपलेला शिवकाळातील दुर्मिळ किल्ला! महाराजांच्या साम्राज्यातील गुप्त रणनीतीस्थळ

Pune News: कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा; विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी| Video Viral

Maharashtra Live News Update: सांगलीत एक कोटी 11 लाखांच्या बनावट नोटांसह मुद्देमाल जप्त, पाच जणांना अटक

Rukmini Vasanth: 'कांतारा' चित्रपटात आपल्या दमदार अभियनाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री कोण?

Laughing Benefits: हसल्याने आरोग्याला कोणकोणते फायदे होतात माहितीये का?

SCROLL FOR NEXT