ind vs sa yandex
Sports

IND vs SA, Weather Update: फायनलचा थरार लांबणार? बारबाडोसमध्ये पाऊस खेळ बिघडवणार

India vs South Africa, T20 World Cup 2024: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलचा थरार रंगणार आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना आज(२९ जून) बारबाडोसमध्ये रंगणार आहे. या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ ट्रॉफी जिंकण्यासाठी दोन हात करताना दिसून येणार आहे. भारतीय संघाने दुसऱ्या सेमिफायनलमध्ये इंग्लंडला धुळ चारत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

तर पहिल्या सेमिफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा एकतर्फी पराभव केला आणि फायनलचं तिकीट मिळवलं आहे. हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरु होणार आहे. तर भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरु होईल. दरम्यान या सामन्यावर पावसाचं सावट असणार आहे.

बारबाडोसमध्ये कसं असेल हवामान?

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार,सामन्यावेळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा सामना पूर्ण दिवस सुरु राहिल असं म्हटलं जात आहे. या सामन्याचं नाणेफेक सकाळी १० वाजता होईल. त्यानंतर १०:३० वाजता सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान सकाळी १० वाजता पाऊस पडण्याची शक्यता ही ५५ टक्के इतकी असणार आहे. तर दुपारी १२ वाजता पाऊस पडण्याची शक्यता ७२ टक्के इतकी असेल. त्यानंतर दुपारी ३ वाजता पाऊस पडण्याची शक्यता ४८ टक्के इतकी असणार आहे.

यापूर्वी झालेल्या पहिल्या सेमिफायनलसाठी आयसीसीने राखीव दिवसाची घोषणा केली होती. तर दुसऱ्या सेमिफायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यासाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला नव्हता. या सामन्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून आयसीसीने अतिरिक्त ४ तास राखीव ठेवले होते. मात्र फायनलच्या सामन्यासाठी आयसीसीने राखीव दिवसाची घोषणा केली आहे.

फायनलचा सामना २९ जून रोजी होणार आहे. मात्र यादिवशी सामना होऊ शकला नाही,तर दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० जून रोजी हा सामना खेळवण्यात येईल. या दिवशीही पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दिवशी जर पाऊस आला आणि सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केलं जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ लंडनला पळाला; पुणे पोलीस आता संपूर्ण टोळीच्या नाड्या आवळणार, पुढचा प्लानही सांगितला

Pune Fire : पुण्यात भीषण दुर्घटना! १४ मजली इमारतीत आग, सिलेंडरचा स्फोट, १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, ५ जखमी

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

SCROLL FOR NEXT