IND vs SA, Final: ज्या मैदानावर होणार फायनलचा सामना, त्या मैदानावर कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड?

India vs South Africa Record In Barbados: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना रंगणार आहे.
ind vs sa
ind vs sayandex
Published on
team india
team indiayandex

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाने जोरदार प्रवेश केला आहे. भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

south africa
south africayandex

हा सामना बारबाडोसच्या केसिंग्टन ओव्हल ब्रिजटाउनमध्ये होणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत या स्पर्धेतील सर्व सामने जिंकले आहेत. त्यामुळे कुठल्यातरी एका संघाचा विजयरथ थांबणार आहे. दरम्यान या मैदानावर कोणत्या संघाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. जाणून घ्या.

south africa
south africayandex

दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. १९७५ मध्ये पहिल्यांदा वर्ल्डकप खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला आजवर एकाही फायनलमध्ये प्रवेश करता आला नव्हता. मात्र एडेन मार्करमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने हा कारनामा करुन दाखवला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ जोर लावताना दिसून येऊ शकतो.

south africa
south africayandex

केसिंग्टन ओव्हलच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेने ३ सामने खेळले आहेत. यापैकी २ सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवता आला आहे. तर १ सामना अनिर्णित राहिला आहे. २०१० नंतर दक्षिण आफ्रिकेने या मैदानावर एकही सामना खेळलेला नाही.

team india
team indiayandex

भारतीय संघाचा या मैदानावरील रेकॉर्ड पाहिला, तर भारतीय संघानेही ३ सामने खेळले आहेत. या ३ पैकी १ सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर २ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

team india
team indiayandex

भारतीय संघासाठी आनंदाची बाब अशी की, भारत विरुद्ध अफगाणिस्तानचा सामना याच मैदानावर झाला होता. त्यामुळे भारतीय संघाला या परिस्थितीचा अंदाज आहे.

south africa
south africayandex

आकडेवारी पाहिली, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ आघाडीवर आहे. कारण या संघाने ३ पैकी २ सामने जिंकले आहेत.

south africa
team indiayandex

तर भारतीय संघाला ३ पैकी १ सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर २ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com