rohit-sharma-with-suryakumar-yadav google
Sports

Suryakumar Yadav: रोहितने १२ वर्षांपुर्वी केलेली 'ती' भविष्यवाणी खरी ठरली!

Rohit Sharma On Suryakumar Yadav: सूर्यकुमारच्या या कामगिरीनंतर रोहित शर्मा सोशल मीडियावर ट्रेन्ड होऊ लागला आहे. काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.

Ankush Dhavre

Rohit Sharma Prediction:

टी-२० क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव हा नंबर १ फलंदाज आहे. फलंदाजीत त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे.आता कर्णधार म्हणूनही तो स्वत:ला सिद्ध करताना दिसून येत आहे. सूर्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ४-१ ने टी-२० मालिका जिंकली होती.

तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवलाय. ही मालिका १-१ च्या बरोबरीत समाप्त झाली आहे. सूर्यकुमारच्या या कामगिरीनंतर रोहित शर्मा सोशल मीडियावर ट्रेन्ड होऊ लागला आहे. काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.

रोहित शर्माचं एक ट्वीट व्हायरल होऊ लागलं आहे. या ट्वीटमध्ये त्याने सूर्यकुमार यादवचं कौतुक केलं होतं. रोहितने हे ट्वीट १० डिसेंबर २०११ रोजी केलं होतं. या ट्वीटमध्ये त्याने लिहिलं होतं की, 'चेन्नईमध्ये नुकताच बीसीसीआयच्या अवॉर्ड्स शोमधून फ्री झालोय. भविष्यात एकापेक्षा एक स्टार खेळाडू पाहायला मिळणार आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मुंबईकर सूर्यकुमार यादव.'

रोहितने १२ वर्षांपुर्वी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. कारण गेल्या २-३ वर्षांत त्याने टी-२० फॉरमॅटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. रोहित आणि सूर्यकुमार यादव हे दोघेही मुंबईकर आहेत. दोघंही मुंबई इंडियन्स संघात एकत्र खेळतात. तो मुबंई इंडियन्स संघासाठी देखील मोलाची भूमिका बजावतोय. (Latest sports updates)

टी-२० क्रिकेटमध्ये सूर्याचा दबदबा..

सूर्यकुमार यादवने आतापर्यंत ६० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २१४१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ४५ इतका राहिलाय. त्याने ४ शतकं आणि १७ अर्धशतकं झळकावली आहेत. सूर्यकुमार यादव टी-२० क्रिकेटमध्ये सुपरहिट ठरत असला तरी वनडे क्रिकेटमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही.

rohit sharma

सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात ५६ चेंडूंचा सामना करत १०० धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार आणि ८ षटकार मारले. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ७ गडी बाद २०१ धावा केल्या. २०२ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या ९५ धावांवर संपुष्टात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT