Suryakumar Yadav Record: कॅप्टन म्हणून सूर्या सुपरहिट! धोनीचा १६ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडत या बाबतीत बनला नंबर १

Most Runs As Indian Captain In South Africa In T20I: सूर्यकुमार यादवने या डावात अर्थशतकी खेळी केली. यासह त्याने माजी भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनीचा १६ वर्षांपुर्वीचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
suryakumar yadav
suryakumar yadavsaam tv news
Published On

India vs South Africa, Suryakumar Yadav Record:

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाने हा सामना गमावला असला तरीदेखील कर्णधार सूर्यकुमार यादवने या सामन्यात मोठा कारनामा करुन दाखवला आहे. त्याने माजी भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनीचा १६ वर्षांपुर्वीचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात नाणेफक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून कर्णधार सूर्यकुमार यादवने ५६ धावांची खेळी केली. या अर्धशतकी खेळीसह तो दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाचा कर्णधार म्हणून सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. यासह त्याने माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी रेकॉर्ड मोडून काढला आहे. धोनीने २००७ मध्ये कर्णधार म्हणून ४७ धावांची खेळी केली होती. (Suryakumar Yadav Record)

या सामन्यात फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने ३६ चेंडूंचा सामना करत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५६ धावांची खेळी केली. हे त्याच्या टी-२० कारकिर्दीतील १७ वे अर्धशतक ठरले असून त्याने टी-२० क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण केल्या आहेत. (Latest sports updates)

suryakumar yadav
IND vs SA 2nd T20I: द.आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा पराभव का झाला? ही आहेत ४ प्रमुख कारणं

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा करणारे फलंदाज..

बाबर आझम- ५२ इनिंग

मोहम्मद रिजवान- ५२ इनिंग

विराट कोहली- ५६ इनिंग

सूर्यकुमार यादव-५६ इनिंग

केएल राहुल - ५८ इनिंग

suryakumar yadav
Suryakumar Yadav Statement: ही चूक टीम इंडियाला पडली महागात! कॅप्टन सूर्याने सांगितलं पराभवाचं नेमकं कारण

यासह सूर्यकुमार यादवने मोठ्या विक्रमात विराट कोहलीची बरोबरी केली आहे. तो टी-२० क्रिकेटमध्ये संयुक्तरित्या सर्वात जलद २००० धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने हा कारनामा ५६ व्या इनिंगमध्ये केला होता. तर सूर्यकुमार यादवने देखील ५६ इनिंगमध्ये २००० धावा पूर्ण केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com