भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे. येत्या १० डिसेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. दोन्ही संघांमध्ये ३ टी-२०,३ वनडे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. टी-२० मालिकेतील पहिला सामना डर्बनच्या किंग्समीड स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.
कसं असेल हवामान?
नुकताच भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने ४-१ ने विजय मिळवला. आता भारतीय संघ बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे. मात्र पहिल्याच सामन्यात पाऊस हजेरी लावणार असल्याची चिन्ह दिसून येत आहे. या सामन्यावेळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दिवशी संपू्र्ण दिवस पाऊस असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
डरबनमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याच्या अहवालानूसार, १० डिसेंबर रोजी पाऊस पडण्याची शक्यता ७० टक्के इतकी असणार आहे. यादरम्यान १८ किमी प्रति तास इतक्या गतीने वारे वाहतील. (Latest sports updates)
असं आहे भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेचं वेळापत्रक..
१० डिसेंबर २०२३: पहिला टी -२० सामना, डर्बन
१२ डिसेंबर २०२३: दुसरा टी -२० सामना, ग्केबेरहा
१४ डिसेंबर २०२३ : तिसरा टी -२० सामना, जोहान्सबर्ग
या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:
यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर,कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.