Team India News: दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाचे हटके स्वागत; प्लेअर्सना बसला सुखद धक्का, BCCI ने शेअर केला जंगी स्वागताचा Video

Team India Reached In South Africa: दक्षिण आफ्रिकेत दाखल झालेल्या भारतीय संघाचं भारतीय पंरपरेनुसार स्वागत करण्यात आलं आहे.
suryakumar-yadav
suryakumar-yadavX/BCCI
Published On

India vs South Africa:

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२०, ३ वनडे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

या दौऱ्यावर होणाऱ्या ३ मालिकांसाठी ३ वेगवेगळ्या कर्णधारांची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेतील पहिला सामना येत्या १० डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेत दाखल झालेल्या भारतीय संघाचं भारतीय पंरपरेनुसार स्वागत करण्यात आलं आहे.

दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाचं जंगी स्वागत..

दक्षिण आफ्रिकेत पोहोचताच भारतीय संघाचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे.ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. दक्षिण आफ्रिकेत भारतीय खेळाडूंचं भारतीय परंपरेनुसार स्वागत केलं गेलं.

यावेळी खेळाडूही आनंदीत असल्याचं दिसून आलं. वनडे वर्ल्डकप झाल्यानंतर भारतीय संघाचा हा पहिलाच दौरा आहे. वर्ल्डकपनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये मायदेशात ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळली गेली.

या मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ४-१ ने विजय मिळवला. १० डिसेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेतही भारतीय संघाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे असणार आहे. (Latest sports updates)

suryakumar-yadav
IND vs SA: टीम इंडियाला मोठा धक्का! कसोटी मालिकेतून प्रमुख गोलंदाज बाहेर होणार? वाचा कारण

टी-२० वर्ल्डकपसाठी तयारी सुरु..

भारतीय संघाने वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दमदार खेळ केला होता. मात्र फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आता भारतीय संघाचं संपूर्ण लक्ष येत्या जून महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेवर असणार आहे.

या मालिकेसाठी भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.

suryakumar-yadav
Pro Kabaddi 2023: पवन सेहरावतचा PKL स्पर्धेत मोठा रेकॉर्ड! असा कारनामा करणारा ठरला पाचवा खेळाडू

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर,कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com