Shreya Maskar
कडक उन्हाळ्यात घरी रोजच्या वापरासाठी अनेक महिला साडी नेसतात. मात्र उन्हाळ्यात वाढत्या गर्मीमुळे साडी नेसण्याचा ताण येतो. तसेच अनेक समस्या उद्भवतात. अशावेळी सुंदर साधी- मऊ कापडाची साडी नेसा. जेणेकरून तुम्हाला गरम होणार नाही.
उन्हाळ्यात आरामदायी आणि स्टायलिश लूक हवा असेल तर सुती, मलमल, लिनन, जॉर्जेट आणि शिफॉनच्या साड्या उत्तम आहेत. हलक्या रंगाच्या, कॉटन, खादी, तांत, कोटा डोरिया, चंदेरी सिल्क आणि कलमकारी साड्या अंगाला थंडावा देतात.
उन्हाळ्यात साडीसाठी पेस्टल शेड्स उत्तम पर्याय आहे. यात बेबी पिंक, पुदिना हिरवा , आकाशी आणि लेमन यलो यांचा समावेश आहे. तसेच तुम्ही पांढरा, पिस्ता आणि लिंबू कलर देखील वापरू शकता. हे रंग उष्णता कमी करतात आणि फ्रेश लूक देतात.
उन्हाळ्यात आरामदायी राहण्यासाठी स्लीव्हलेस, एल्बो-लेंथ , बोट नेक किंवा व्ही-नेक डिझाईन्सचे ब्लाउज उत्तम पर्याय आहे. याच्या वेगवेगळ्या डिझाइन्स पाहायला मिळतात.
उन्हाळ्यात नाडीचा पेटीकोट वापरण्याऐवजी इलास्टिकचा पेटीकोट वापरा, कारण तो पोटाच्या आसपास घट्ट होत नाही आणि आरामदायक वाटतो. तसेच साडी जास्त फुगत देखील नाही.
घरातील साडीवर जवळच बाजारात जायचे असेल तर मेकअप हलका ठेवा आणि साडीची स्टाईल सुटसुटीत ठेवा. जेणेकरून अंगाला टोचणार नाही किंवा अस्वस्थ वाटणार नाही.
उन्हाळ्यात साडीचा पदर हलका, सुटसुटीत आणि हवेशीर असावा. पदर पीन केलात तर उकाडा जास्त जाणवतो. त्यामुळे पदर खांद्यावर मोकळा सोडल्यास स्टायलिश आणि आरामदायी वाटते.
साडी नियमित स्वच्छ करा. तसेच योग्य पद्धतीने वाळवा. ती ओली राहणार नाही, याची काळजी घ्या. तसेच आठवड्यातून एकदा साडीला इस्त्री करा. तसेच त्यांची घडी करून ठेवा, जेणेकरून साडी खराब होणार नाही.