Shreya Maskar
केसांची मुळे रक्ताच्या पुरवठ्यावर अवलंबून असतात. टाळूतील रक्ताभिसरण सुरळीत राहण्यासाठी तुम्ही डोक्याला हलका मसाज करा. आठवड्यात २-३ वेळा केसांना मसाज करा.
दररोज ५-१० मिनिटे केसांना तेलाने मालिश केल्याने केसांची चांगली वाढ होते. नियमितपणे केसांची मालिश केल्याने टाळूतील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केसांच्या कूपांना (Follicles) जास्तीत जास्त ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये मिळतात.
केसांसाठी प्रथिने गरजेचे आहेत. तुमच्या आहारात नियमितपणे प्रथिनेयुक्त पदार्थ, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, अंडी , सुकामेवा आणि बिया यांचा समावेश करा.
अति ताणामुळे शरीरात कोर्टिसोल (Cortisol) नावाच्या संप्रेरकाची (Hormone) पातळी वाढते, ज्यामुळे केस गळती वाढू शकते. म्हणून, ताण व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करा. हळू श्वास घेणे, चालणे आणि मध्ये मध्ये कामातून छोटा ब्रेक घेणे गरजेचे आहे.
अतिशय घट्ट पोनीटेल, अंबाडा किंवा वेणी घालणे टाळा. यामुळे केसांवर सतत दाब पडतो, केसांची मुळे कमकुवत होतात आणि केस गळती वाढते. नेहमी केस हलके बांधा.
उशीच्या घर्षणामुळे केस तुटू शकतात. म्हणून, झोपण्यापूर्वी केसांची सैल वेणीत बांधा. यामुळे केस कमी तुटतात आणि केसांची लांबी टिकून राहते.
दिवसातून किमान 1-2 वेळा केस विंचरा. केस हळुवारपणे विंचरल्याने केसांतील गुंता सुटतो आणि टाळूतील नैसर्गिक तेल केसांमध्ये समान रीतीने पसरते.केस जास्त तुटणे टाळण्यासाठी नेहमी खालून (टोकाकडून) कंगवा फिरवायला सुरुवात करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.