आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाला विजयासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. वर्ल्डकप मायदेशात होता, सर्व खेळाडूही तुफान फॉर्ममध्ये होते. सुरुवातीचे ९ सामने जिंकून भारतीय संघाने सेमीफायनलही जिंकली.
मात्र फायनलमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागलं. यासह पुन्हा एकदा वर्ल्डकप जिंकण्याची संधी हुकली. दरम्यान वर्ल्डकप फायनलनंतर पहिल्यांदाच रोहित शर्माने मुलाखत दिली आहे.
रोहितच्या एका मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ team45pro या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तो म्हणतोय की,'या नैराश्यातून कसं बाहेर यावं, हे मला कळत नाहीये. पराभव झाल्यानंतर काही दिवस तर मला कळतच नव्हतं की, नक्की काय करायचंय. माझ्या कुटुंबाने आणि मित्रांनी मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली. माझ्या सभोवतालचे वातावरण थोडे हलके ठेवले, ज्याचा मला खूप फायदा झाला. ही मुळीच सोपी बाब नव्हती. मात्र आयुष्यात पुढे जात राहावं लागतं. खरं सांगु तर हे खूप कठीण होतं. आयुष्यात इतक्या सोप्या पद्धतीने पुढे जाता येत नाही.' (Rohit Sharma Interview)
तसेच तो पुढे म्हणाला की,'मी ५० षटकांचा वर्ल्डकप पाहून मोठा झालोय. वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी भेट होती. आम्ही या वर्ल्डकप स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेतली होती, मात्र शेवट निराशाजनक होता. एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला हवी असते आणि ती गोष्ट जेव्हा आपल्याला मिळत नाही तेव्हा दु:ख होतं. मला तर वाटतं, आम्हाला जे जे करण्याची गरज होती आम्ही ते सर्व केलं.' (Latest sports udpates)
'जर मला कोणी विचारेल की आमचं काय चुकलं तर..कारण आम्ही सुरुवातीचे १० सामने जिंकले होते, १० सामन्यांमध्ये आम्ही काही चुका केल्या, जेव्हा तुम्ही सामना खेळण्यासाठी उतरता तेव्हा चुका होतात. कारण कोणीच इतकं परफेक्ट नाही. तरीही मला माझ्या संघाचा अभिमान आहे. कारण आम्ही ज्या पद्धतीने खेळलो ते शानदार होतं. मी विश्वासाने सांगु शकतो की, आमचे खेळाडू फायनलपर्यंत जे काही खेळलो त्याने क्रिकेट चाहत्यांना आनंदाचे क्षण साजरा करण्याची संधी दिली.'असं रोहित शर्मा म्हणाला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.