भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे धुतला गेला. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला ५ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. मालिकेतील शेवटचा सामना जिंकून भारतीय संघ मालिका बरोबरीत आणण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला आपल्या प्लानमध्ये काही बदल करावे लागणार आहेत.
या गोलंदाजांनी केली सुमार कामगिरी..
मालिकेतील तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये काही बदल पाहायला मिळू शकतात. या सामन्यात भारतीय गोलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. खेळपट्टी,हवामान आणि एकंदरीत परिस्थिती भारतीय संघाच्या विरोधात असली तरी भारतीय गोलंदज त्या रिदममध्ये दिसून आले नाही. हेच कारण आहे की, भारतीय संघाने हे आव्हान १३.५ षटकात पूर्ण केलं.
भारतीय संघातील वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने २ षटकात १५.५० च्या इकॉनॉमीने ३१ धावा खर्च केल्या. तसेच मुकेश कुमारने ११.३० च्या इकॉनॉमीने ३ षटकात ३४ धावा खर्च केल्या.
फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाने २.५ षटकात २८ धावा खर्च केल्या. तर मोहम्मद सिराजने ३ षटकात ९ च्या इकॉनॉमीने २७ धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याने १ फलंदाजाला पॅव्हेलियनची वाट दाखवली. (Latest sports updates)
भारतीय संघात बदल होण्याची शक्यता..
गोलंदाजांची ही सुमार कामगिरी पाहता भारतीय गोलंदाजी आक्रमणात बदल होणं निश्चित आहे. फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईला येणाऱ्या सामन्यात संघात स्थान दिलं जाऊ शकतं. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत सर्वाधिक गडी बाद करत प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला होता. त्यामुळे तो तिसऱ्या सामन्यात कमबॅक करताना दिसून येऊ शकतो.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत ऋतुराज गायकवाडने देखील दमदार खेळ केला होता. या मालिकेत त्याने १ शतकही झळकावलं होतं. आगामी टी-२० सामन्यात त्याला संधी मिळणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.