भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर भारतीय संघाने विजयासाठी २०२ धावांचे आव्हान ठेवले होते.
या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या ९५ धावांवर संपुष्टात आला. या सामन्यात फलंदाजीत धुमाकूळ घालणारा सूर्यकुमार यादव क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त होताच,रविंद्र जडेजा नेतृत्वाची जबाबदारी पार पाडताना दिसून आला. तर झाले असे की,क्षेत्ररक्षण करत असताना त्याने चेंडू अडवला. मात्र चेंडू उचलून फेकत असताना त्याच्या डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली. दुखापत झाल्यानंतर तो वेदनेने कळवळताना दिसून आला.त्याला व्यवस्थित उभं देखील राहता येत नव्हतं. त्यानंतर सहकाऱ्यांनी त्याला मैदानाबाहेर नेलं. त्यानंतर तो क्षेत्ररक्षण करण्यासाठी आलाच नाही. (Suryakumar Yadav Injury Update)
सूर्याच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट..
हा सामना झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने आपल्या दुखापतीबाबत मोठी अपडेट दिली आहे. तो म्हणाला की,'मी आता ठीक आहे.मी चालू शकतोय. सर्व काही व्यवस्थित आहे.' तसेच आपल्या शतकी खेळीबाबत बोलताना तो म्हणाला की,'शतक झळकावल्यानंतर सामना जिंकणं हा एक सुख:द अनुभव आहे. याने मला खूप आनंद होतो. आम्हाला निडर होऊन क्रिकेट खेळायचं होतं. आमच्या डोक्यात हेच होतं की, फलंदाजी करायची, स्कोअर बोर्ड हलतं ठेवायचं आणि धावांचा बचाव करायचा. ही मुलं दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. आनंद आहे की, त्यांनी करुन दाखवलं.' (Latest sports updates)
तसेच तो कुलदीप यादवचं कौतुक करताना तो म्हणाला की,'त्याला कधीच आनंद होत नाही. त्याची भूख नेहमी जास्तच असते. त्याच्या वाढदिवशी हे एक सर्वोत्तम गिफ्ट आहे.'कुलदीप यादवने या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २०२ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा बचाव करताना कुलदीप यादवने ५ गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या ९५ धावांवर संपुष्टात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.