IND vs SA T20: 'सूर्या'च्या फटकेबाजीनंतर कुलदीपने पेटवला विजयाचा 'दीप'; टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय

india vs south Africa: दुसऱ्या डावात फिरकीपटू कुलदीप यादवने विरोधी संघावर 'पंजा' मारत सामना जिंकवला. टीम इंडियाने विजयाबरोबरच मालिका १-१ अशी बरोबरीत संपवली.
team india win match
team india win match Twitter
Published On

India vs South Africa 3rd T20:

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत सूर्यकुमारच्या यंगीस्थानने तिसरा सामना जिंकून टी-२० फॉरमॅटमध्ये आपला ऐतिहासिक विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाच्या सूर्यकुमारने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना झोडपत शतकी खेळी खेळली. त्यानंतर दुसऱ्या डावात फिरकीपटू कुलदीप यादवने विरोधी संघावर 'पंजा' मारत सामना जिंकवला. टीम इंडियाने विजयाबरोबरच मालिका १-१ अशी बरोबरीत संपवली. (Latest Marathi News)

टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील टी-२० मालिकेचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर मालिकेचा दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने ५ विकेटने जिंकला. मालिकेचा तिसरा सामना 'करो या मरो' असा होता. याच सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय मिळवला. या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि कुलदीप यादवने जबरदस्त खेळी दाखवली.

team india win match
IND vs SA T20:सूर्याची बॅट तळपली; दक्षिण आफ्रिकेत शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज

सूर्यकुमारची बॅट तळपळली

टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण मिळाल्यानंतर सूर्यकुमारने जोरदार फटकेबाजी केली. सूर्यकुमारच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेला २०२ धावांचं आव्हान दिलं.

टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी ९५ धावांवर लोटांगण घातलं. कुलदीपने २.५ षटकात १७ धावा देऊन ५ गडी बाद केले. तर रविंद्र जडेजाने दोन गडी बाद केले. अर्शदीप आणि मुकेश कुमारने प्रत्येकी १-१ गडी बाद केले.

फिरकीपटू कुलदीपची जादू चालली

टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मॅथ्यूने ४ तर रीजा हेंड्रिक्सने ८ धावा केल्या. तर कर्णधार मार्कराम २५ धावांवर बाद झाला. डेव्हिड मिलरने ३५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या ७ खेळाडूंनी दहाचा आकडाही पार केला नाही. कुलदीपने २० व्या षटकात ३ गडी बाद केले. त्यात मिलरचाही सामावेश आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com