भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेचा तिसरा सामना आज होत आहे. हा तिसरा टी२० सामना जोहान्सबर्गमध्ये खेळला जात आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २०२ धावांचे लक्ष्य दिले आहे. जोहान्सबर्गच्या मैदानावर सूर्याच्या फलंदाजींने आफ्रिकेच्या गोलंदाजांना घाम काढला. सूर्यकुमार यादवने कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी करत दमदार शतक ठोकलं. (Latest News)
दरम्यान आज आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिलं. आफ्रिकेच्या हा निर्णय सूर्यकुमार आणि यशस्वी जायसवालने चुकीचा ठरवला. दक्षिण आफ्रिकेत शतक करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटर ठरलाय. टी२० मध्ये शतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमारने बाबर आझमला मागे सोडलंय. सूर्यकुमार यादवने ५६ चेंडूत शतक झळकावले आहे. त्याने ७ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने त्याने १०० धावा केल्या. दम्यान यशस्वी जयस्वालने ६० धावा केल्या आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला होता. तिसरा सामन्यात विजय मिळण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरलाय. जर भारताने हा सामना गमावला तर भारताच्या हातातून संपूर्ण मालिका जाणार आहे. यामुळे भारत आजचा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न करेल.
पुरुषांच्या T20 मध्ये सर्वाधिक शतकं करणारे फलंदाज
रोहित शर्मा - ४
ग्लेन मॅक्सवेल - ४
सूर्यकुमार यादव - ४
बाबर आझम- ३
कॉलिन मुनरो- ३
सबावून दाविझी - ३
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.