Sports

India vs Pakistan: उस्मान तारिक की खैर नही! भारतीय फलंदाज करणार जोरदार धुलाई; सूर्यकुमार आणि रिंकू सिंगचा मास्टरप्लॅन तयार |Video

Suryakumar and Rinku Singh Plan Against Usman Tariq: आर प्रेमदासा स्टेडियमवर भारतविरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंगने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करण्यासाठी खास प्लॅन तयार केलाय.

Bharat Jadhav

  • टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना

  • पाकिस्तानचा मिस्ट्री स्पिनर उस्मान तारिक चर्चेत

  • सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंह यांचा खास मास्टरप्लॅन

टी२० वर्ल्ड कपमध्ये आज हायहोल्टेज सामना होणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी असलेले दोन्ही संघ भिडणार आहेत. भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट चाहते सामना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान आर.प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याआधी पाकिस्तानचा 'मिस्ट्री फिरकी गोलंदाज' उस्मान तारिक संघासाठी ट्रम्प कार्ड म्हणून उदयास आला आहे.

थांबवून गोलंदाजी करण्याच्या स्टाइलनं अनेकांना चकीत केलंय. त्याने आपल्या अनोख्या स्टाइलने अनेकांच्या दांड्या गुल केल्या आहेत. परंतु भारतीय संघाचे फलंदाजांपुढे त्याचा दाळ शिजणार नाही. कारण कर्णधार सूर्यकुमार यादव आणि फिनिशर रिंकू सिंग यांनी त्याची धुलाई करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केलाय.

टीम इंडिया या अभ्यासक्रमाबाहेरील धोक्याला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. सूर्या आणि रिंकूने तशी तयारीच केली आहे, असं भारतीय कर्णधार सूर्याकुमार यादव म्हटलंय. दरम्यान सामनापूर्वीच्या पत्रकार परिषदेत, जेव्हा एका पाकिस्तानी पत्रकाराने उस्मान तारिकच्या "अभ्यासक्रमाबाहेरील" धमकीबद्दल विचारले तेव्हा कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिले. "जर अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न आला तर मी तो सोडणार नाही, असं सुर्यानं उत्तर दिलं

सूर्या म्हणाला की, "कधीकधी परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न येतात, परंतु आपण त्यांना दुर्लक्षित करू शकत नाही. त्यांना हाताळण्याचा मार्ग तुम्हाला स्वतः शोधावा लागतो." "तारिक जेव्हा गोलंदाजी करायला येतो तेव्हा त्याचे शैली थोडी वेगळी असते, पण आम्ही हार मानू शकत नाही. आम्ही त्याच गोलंदाजांसह आणि त्याच कृतींसह सराव करत आहोत, अशा प्रकारे अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नाचं उत्तर सोडवून असं सूर्यकुमार यादव म्हणाले.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, शनिवारी संध्याकाळी पावसामुळे प्रभावित झालेल्या सराव सत्रात सूर्या आणि रिंकू सिंगने उस्मान तारिकच्या गोलंदाजीच्या कृती नक्कल करत सराव केला. सूर्या त्याच 'पोझ'सह इशान किशनला गोलंदाजी करताना दिसला, तर रिंकू सिंग देखील शेजारच्या नेटमध्ये त्याचा सराव करत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MS Dhoni आयपीएलच्या किती सामन्यांना मुकणार? का असणार संघाबाहेर?

Bihar Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार CM पदाचा राजीनामा

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 'नो किंग्स' आंदोलन; 90 लाख नागरीक उतरले रस्त्यावर, कारण काय?

'वेलकम टू हेल' इराणचा अमेरिकेला इशारा, इराणची धमकी, जगाला धडकी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पुन्हा चर्चा, दादांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाची ऑफर

SCROLL FOR NEXT