ऐकवं ते नवलच! तीन दिवसांत १०,००० कंडोम संपले; ऑलिंपिकमध्ये विचित्र प्रकार, आयोजकही चक्रावले
विंटर ऑलिम्पिक 2026 मध्ये कंडोम टंचाईची चर्चा
3 दिवसांत 10 हजार कंडोम वापरल्याचा दावा
सुरक्षित संबंधासाठी ऑलिम्पिकमध्ये कंडोम वितरणाची परंपरा
इटलीतील मिलान-कॉर्टिना येथे झालेल्या हिवाळी ऑलिंपिकमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. खेळाडूंच्या निवासासाठी बांधलेल्या गेम्स व्हिलेजमध्ये करण्यात आलेल्या कंडोमचा पुरवठा अवघ्या तीन दिवसांत संपल्याची बाब उघडकीस आलीय. खेळांडूंनी कंडोमचा इतक्या प्रमाणात वापर पाहून ऑलिंपिकचे आयोजकांनीही आपल्या डोक्याला हात मारण्याची वेळ आलीय.
डेली मेल यूकेमधील एका वृत्तानुसार मिलानमधील गेम्स व्हिलेजमध्ये खेळाडूंना राहण्यासाठी १,४०० बेडची व्यवस्था करण्यात आलीय. खेळाडूंच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी बॅनर देखील लावण्यात आलेत. त्यावर "आरोग्य प्रथम: प्रतिबंध आणि समजदारी " असे लिहिलेले आहे.
हाती आलेल्या वृत्तानुसार, सुरुवातीला आयोजकांनी गेम्स व्हिलेजमध्ये १०,००० कंडोमचा साठा केला होता. याचा अर्थ प्रत्येक खेळाडू दररोज दोन कंडोम वापरू शकत होते. परंतुखेळाडूंनी कंडोमचा वापर इतक्यादा मुबलक प्रमाणात केला की ते तीन दिवसांतच संपले.
नवीन कंडोम न मिळाल्याने खेळाडू पडले चिंतेत
वृत्तानुसार, एका खेळाडूने इटालियन वृत्तपत्र ला स्टॅम्पाला सांगितले की, "साठा फक्त तीन दिवसांत संपला. नवीन कंडोम लवकरच येईल, असं आयोजक सांगतात, पण आम्हाला माहित नाही की कधी? गेम्स व्हिलेजमध्ये खेळाडूंना शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी कोणत्याही सुविधा देण्यात आली नाहीये.
असे असूनही खेळाडूंना एक योग्य जागा सापडली आहे. तेथे "शूज-ऑफ रिलॅक्सेशन रूम" तयार करण्यात आले आहे. यात मंद प्रकाश आणि मधूर संगीत वाजत असतं. दरम्यान थकवा घालवण्यासाठी बनवण्यात आलेल्या या खोलीचा वापर खेळाडूंनी खूपच जास्त केला, अनेकजण गंमतीनं म्हणत आहेत.
कॅनेडियन संघ प्रायव्हेसी हॉटेलमध्ये दाखल
गेम्स व्हिलेजमध्ये भरपूर लैंगिक क्रियाकलाप असूनही कॅनेडियन संघाला सुविधा आवडल्या नाहीत. प्रायव्हसी अधिक असवी यासाठी त्यांनी गेम्स व्हिलेज सोडले आणि एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहायला गेल्याचा प्रकारही समोर आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

