IPL 2026 : आयपीएलआधीच क्रिकेट विश्वाला आश्चर्याचा धक्का, राजस्थान रॉयल्सनं केली नव्या कर्णधाराची घोषणा

ipl 2026 rajasthan royals new captain riyan parag : आयपीएल २०२६ च्या १९ व्या पर्वासाठी राजस्थान रॉयल्सनं नव्या कर्णधाराची घोषणा केलीय. अवघ्या २४ वर्षांच्या अष्टपैलू खेळाडूच्या खांद्यावर संघाची धुरा दिली आहे. या निवडीनं संघानं क्रिकेट विश्वातील धुरंधरांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
IPL 2026 : आयपीएलआधीच क्रिकेट विश्वाला आश्चर्याचा धक्का, राजस्थान रॉयल्सनं केली नव्या कर्णधाराची घोषणा
Big Surprise Before IPL 2026 as Rajasthan Royals Hand Captaincy to Riyan Paragsaam tv
Published On

आयपीएल २०२६ ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच संघात अनेक मोठे बदल करून क्रिकेट विश्वाला धक्का देणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघानं नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. चौफेर फटकेबाजी करून प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची पिसे काढणाऱ्या आणि गरज पडली तर गोलंदाजीच कमाल करून दाखवण्याची प्रचंड क्षमता असलेल्या रियान परागकडे संघाचं नेतृत्व सोपवलं आहे. अवघ्या २४ वर्षांच्या अष्टपैलू युवा खेळाडूकडं जबाबदारी देऊन संघ व्यवस्थापनानं पुन्हा एकदा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल २०२६ ही स्पर्धा लवकरच सुरू होणार आहे. या १९ व्या पर्वासाठी राजस्थान रॉयल्स संघानं आपल्या स्क्वाडमध्ये अनेक मोठे बदल केले होते. मागील मोसमापर्यंत संघाचा कर्णधार असलेल्या संजू सॅमसनला ट्रेड विंडोच्या माध्यमातून चेन्नई सुपर किंग्जकडं दिलं. हा आयपीएल वर्तुळातील मोठा भूकंप मानला जात होता. त्यानंतर आयपीएल २०२६ साठी राजस्थान रॉयल्सचा नवा कर्णधार कोण असेल याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. चेन्नईकडून राजस्थान संघात आलेल्या रवींद्र जडेजाकडं कर्णधारपद दिलं जाऊ शकतं, असा अंदाज होता. पण सर्व चर्चांना पूर्णविराम देत राजस्थान संघानं रियान परागच्या नावाची घोषणा केली.

आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून अपेक्षित कामगिरी होऊ शकली नाही. मागील सीझनमध्ये संजू सॅमसन दुखापतीनं ग्रस्त होता. त्यामुळं ८ सामने खेळू शकला नव्हता. त्यामुळं रियान परागनं कर्णधारपद सांभाळलं होतं. पण त्याच्या नेतृत्वात खेळलेल्या ८ सामन्यांपैकी फक्त दोन सामन्यांत विजय मिळाला होता. तर सहा सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले होते.

रियान परागनं कर्णधारपद सांभाळताना फलंदाजीत चांगली कामगिरी केली होती. आठ सामन्यांमध्ये ३८.५७ च्या सरासरीने धावा केल्या होत्या. कोलकाता नाइट रायडर्स संघाविरुद्ध आयपीएल कारकीर्दीतली सर्वात मोठी खेळी केली होती. त्यानं या सामन्यात ९५ धावा कुटल्या होत्या.

IPL 2026 : आयपीएलआधीच क्रिकेट विश्वाला आश्चर्याचा धक्का, राजस्थान रॉयल्सनं केली नव्या कर्णधाराची घोषणा
ईशान किशन आणि हार्दिक पंड्याची वादळी खेळी; टीम इंडियाने नामिबियाला धूळ चारली, सुपर-8 मध्ये मिळवलं स्थान

जगातल्या सर्वात मोठ्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रियान परागनं २०१९ मध्ये पदार्पण केलं होतं. मागील सात मोसमांपासून तो राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतोय. २०२४ मध्ये त्यानं सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यावेळी त्यानं ५२.०९ च्या सरासरीने ५७३ धावा केल्या होत्या. तर आतापर्यंत पराग आयपीएल स्पर्धेत एकूण ८४ सामने खेळला आहे. त्यात त्याने २६.०१ च्या सरासरीने १५६६ धावा केल्या आहेत. याशिवाय तो संघाच्या गरजेनुसार गोलंदाजीही करतो. आतापर्यंत त्यानं गोलंदाजीत सात विकेट्स घेतल्या आहेत.

IPL 2026 : आयपीएलआधीच क्रिकेट विश्वाला आश्चर्याचा धक्का, राजस्थान रॉयल्सनं केली नव्या कर्णधाराची घोषणा
Australia vs Zimbabwe: टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात उलटफेर; झिम्बाब्वे संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला धूळ चारली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com