IND vs PAK, Women’s Asia Cup Rising Stars: पाकिस्तानचा धुव्वा; T20 सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेट राखत विजय

Team India Won IND vs PAK, Women’s Asia Cup Rising Stars : महिला रायझिंग स्टार्स आशिया कपमध्ये पाकिस्तान अ संघाने भारत अ संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी केली. पण त्यांना शंभरीही गाठता आली नाही. या सामन्यात भारत संघाने दमदार विजय मिळवला.
Team India Won IND vs PAK, Women’s Asia Cup Rising Stars
India A celebrate their 8-wicket win over Pakistan A during the Women’s Asia Cup Rising Stars T20 match in Bangkok.saam tv
Published On
Summary
  • महिला रायझिंग स्टार्स आशिया कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

  • भारताने ८ विकेट्स राखून सामना जिंकला

  • पाकिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तानची भिडत होणार आहे. मात्र त्याआधी भारतीय क्रिकेट चाहत्यांना खूश करणारी बातमी हाती आली आहे. बँकॉकमध्ये भारत-पाकिस्तानचा हायव्होल्टेज सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ८ गडी राखून पराभव केलाय. हा सामना महिला रायझिंग स्टार्स आशिया कपमध्ये खेळला गेला. या सान्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारत अ संघाच्या महिला गोलंदाजांनी पाकिस्तान अ संघाच्या फलंदाजीचं कंबरंड मोडलं.

Team India Won IND vs PAK, Women’s Asia Cup Rising Stars
IND vs PAK: पाकिस्तानविरूद्ध हे ११ धुरंधर उतरणार मैदानात; 'या' खेळाडूचा पत्ता कट होण्याची शक्यता

भारतीय गोलंदाजांचा बेदक गोलंदाजीमुळे पाकिस्तान अ महिला संघाने पटापट विकेट गमावल्या. पाकिस्तान अ संघाच्या सलामी जोडीची फक्त दोन धावांची भागीदारी करता आली. पाकिस्तान अ संघाने १५ धावांवर दुसरा बळी गमावला. त्यानंतर पुढील १७ धावांमध्ये आणखी चार विकेट पडल्या. भारतीय संघाच्या गोलंदाजी इतकी जबरदस्त झाली की, पाकिस्तान अ महिला संघाच्या ६ फलंदाजांना फक्त ३२ धावा करता आल्या.

Team India Won IND vs PAK, Women’s Asia Cup Rising Stars
ऐकवं ते नवलच! तीन दिवसांत १०,००० कंडोम संपले; ऑलिंपिकमध्ये विचित्र प्रकार, आयोजकही चक्रावले

पाकिस्तानच्या अ संघाला साधी शंभरीचा आकाडाही पार करता आला नाही. २० षटकांच्या सामन्यात पाकिस्तनाचा संघ १८.५ षटकांत ९३ धावांवर सर्वबाद झाला. महिला रायझिंग स्टार्समध्ये पाकिस्तान अ संघाच्या फलंदाजांची अवस्था इतकी वाईट होती की त्यांच्या फक्त ३ फलंदाजांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली.

यात सलामीवीर शवाल झुल्फिकारच्या २३ धावा, गुल रुखने २१ धावा, तर अनुषा नसीरच्या १७ धावांचा समावेश आहे. दुसरीकडे भारत अ संघाकडून राधा यादव, प्रेमा रावत आणि सलमा ठाकोर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मिनू मणी आणि जिंतीमणी कलिता यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. गोलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर, भारतीय फलंदाजांनीही आपली शानदार खेळी दाखवली. मात्र भारतीय संघाने पहिला विकेट शुन्य धावेवर बाद झाला. त्यानंतर भारताने पाकिस्तानला कोणतीही संधी दिली नाही. त्यांचा दुसरा बळी ७९ धावांवर पडला. भारताने ९४ धावांचे लक्ष्य १०.१ षटकात फक्त दोन गडी गमावून पूर्ण केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com