IND Vs PAK Handshake Controversy x
Sports

IND Vs PAK : भारत विरुद्ध पाकिस्तान हँडशेक वादावर बीसीसीआयने मौन सोडलं; ICC ने पाकला तोंडावर पाडलं

IND Vs PAK Handshake Controversy : आशिया कपमध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या संघाशी हस्तांदोलन करणे टाळले. यावरुन पाकिस्तानने आयसीसीकडे भारताविरुद्ध तक्रार केली

Yash Shirke

  • आशिया कप २०२५ मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन टाळले.

  • पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे भारताविरुद्ध तक्रार दाखल केली, पण बीसीसीआयने भारतीय खेळाडूंच्या कृतीत काही चुकीचे नसल्याचे स्पष्ट केले.

  • आयसीसीने पाकिस्तानची तक्रार नाकारली आणि मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी फेटाळली.

Asia Cup 2025 : आशिया कप २०२५ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने ७ गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला. सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवस भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. या घटनेवर नाराजी व्यक्त करत पीसीबीने आयसीसीकडे अधिकृत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बीसीसीआयने स्पष्टीकरण दिले आहे. भारतीय खेळाडूंच्या कृतीत काहीही चुकीचे नव्हते, असे बीसीसीआयने म्हटले आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना संपल्यानंतर हस्तांदोलन करणे ही बंधनकारक परंपरा नसून फक्त सदिच्छा देण्याची गोष्ट आहे, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. खेळाच्या शेवटी खेळाडूंना हस्तांदोलन करण्यास भाग पाडणारा कोणताही कायदा अस्तित्वात नाही. दोन्ही देशातील वाढत्या तणावामुळे भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन करणे किंवा संवाद साधणे टाळले, असेही अधिकाऱ्याने म्हटले आहे.

'जर तुम्ही आयसीसीच्या नियमांचे पुस्तक वाचले तर त्यात विरोधी संघाशी हस्तांदोलन करण्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण नमूद केलेले नाहीये. हस्तांदोलन करणे ही एक सद्भावनापूर्ण कृती आहे. ही कृती कायदा नसून एका प्रकारची परंपरा आहे, ही परंपरा जगभरातील खेळांमध्ये पाळली जाते. जर हस्तांदोलन करण्याचा कोणताच कायदा नाहीय, तर भारतीय क्रिकेट संघ हा पाकिस्तानशी हस्तांदोलन करण्यास बांधील नाही', असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.

पीसीबीने आयसीसीच्या आचारसंहिता आणि क्रिकेटच्या भावनेशी संबंधित एमसीसी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना सध्याच्या स्पर्धेतून तातडीने काढून टाकण्याची मागणी केली आहे. पीसीबीचे प्रमुख मोहसीन नक्वी यांनी ‘एक्स’ या माध्यमावर सांगितले की, आशिया कपमधील मॅच रेफरींच्या या कृतींबाबत त्यांनी आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान हँडशेक वादावरुन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताच्या विरोधात आयसीसीकडे तक्रार केली. यावर आयसीसीने पाकिस्तानचे कान टोचत त्यांची तक्रार नाकारली. हस्तांदोलन टाळल्याच्या घटनांमुळे आयसीसीकडे सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. आयसीसीने या तक्रारीवर प्रतिक्रिया देत पाकिस्तानची मागणी फेटाळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोळसेवाडी पोलीस ठाणे राडा प्रकरण; भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाडांना दिलासा, कोर्टाकडून निर्दोष मुक्तता

Rajabai Tower History : मुंबईचा बिग बेन! राजाबाई टॉवरच्या नावामागचा रंजक किस्सा जाणून घ्या

Maharashtra Live News Update: - एकवीस दिवसाच्या गणरायाच्या विसर्जनाने गणेशोत्सवाची सांगता..

Local Body Election: राज्यातील निवडणुका तीन टप्प्यात होणार? अशी असू शकते निवडणूक प्रक्रिया

Dhule News: धुळ्यात अपघाताचा थरार! दोन ट्रकची जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू तर ७० बकऱ्या मृत्यूमुखी

SCROLL FOR NEXT