India vs New Zealand Semi Final Saam tv news
क्रीडा

IND vs NZ Semi Final: तर न्यूझीलंडचा पराभव निश्चित! सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या या खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा

Players To Watch Out In IND vs NZ: या सामन्यात भारतीय संघातील ३ खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे.

Ankush Dhavre

India vs New Zealand, World Cup Semi Final:

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. हा सामना बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघातील खेळाडू पूर्ण जोर लावताना दिसून येतील. दरम्यान ३ असे खेळाडू आहेत जे न्यूझीलंडवर भारी पडू शकतात.

भारतीय संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहली चांगलाच फॉर्ममध्ये आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी आहे. त्याने ९ सामन्यांमध्ये ५९४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतक आणि ५ अर्धशतक झळकावले आहेत. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातही त्याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने देखील भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली आहे. तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरतोय. मात्र पावरप्लेच्या षटकात तो चौकार आणि षटकार मारत विरोधी संघातील गोलंदाजांवर दबाव बनवण्यात सक्सेसफुल ठरतोय.

नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात तो अर्धशतकी खेळी करून माघारी परतला होता. त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये ५०३ धावा केल्या आहेत. ज्यात एक शतकी खेळीचा समावेश आहे. (Latest sports updates)

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी देखील चांगल्याच रिदममध्ये आहे. सुरुवातीचे ४ सामने संघाबाहेर राहिल्यानंतर पुढील ५ सामन्यात त्याला खेळायची संधी मिळाली. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. या स्पर्धेतील ५ सामन्यांमध्ये त्याने १६ गडी बाद केले आहेत.

पहिल्याच सामन्यात त्याने ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला होता. या कामगिरीच्या बळावर त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली होती. साखळी फेरीत न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ५४ धावा खर्च करत ५ गडी बाद केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

Personality Test: पहिली मुलगी दिसली की कवटी? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT