Virat Kohli Bowling: 'कोहली को बॉलिंग दो' फॅन्सची मागणी रोहितने मान्य केली अन् विराटने सार्थ ठरवली; पाहा Video

Virat Kohli Bowling Video: या सामन्यात विराटने गोलंदाजी करत विकेट मिळवली आहे.
virat kohli
virat kohli twitter
Published On

Virat Kohli Bowling Viral Video:

भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली नेदरलँडविरुद्ध गोलंदाजी करताना दिसून आला. या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना सामना पाहण्यासाठी आलेल्या फॅन्सने रोहितकडे, विराटला गोलंदाजी देण्याची मागणी केली.

ही मागणी पूर्ण करत रोहितने चेंडू विराटच्या हाती सोपवला. रोहितचा विश्वास सार्थ ठरवत विराटने दुसऱ्याच षटकात विकेट मिळवली.विराटने विकेट मिळवता पत्नी अनुष्का शर्माने दिलेली रिॲक्शन सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

विराट कोहलीने विकेट घेताच अनुष्का शर्माला हसू आवरलं नाही. नेदरलँड संघाची फलंदाजी सुरू असताना २५ वे षटक टाकण्यासाठी विराट कोहली गोलंदाजीला आला होता. या षटकात त्याने स्कॉट एडवर्डसला यष्टिरक्षकाच्या हातून झेलबाद करत माघारी धाडलं.

ही विकेट मिळताच विराटचा आनंद गगनात मावेनासा झाला. तर कॅमेरामनने कॅमेरा अनुष्का शर्माकडे फिरवला. त्यावेळी ती देखील जल्लोष साजरा करताना दिसून आली. मात्र तिला हसू आवरत नव्हतं.

हा विराट कोहलीचा वनडे कारकिर्दीतील पाचवा विकेट ठरला. वनडेसह विराटने टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना ४ गडी बाद केले आहेत. विराटने ९ वर्षांनंतर वनडे क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली.

यापूर्वी बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यातही तो गोलंदाजी करताना दिसून आला होता. हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेल्यानंतर विराट ३ चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. दरम्यान विराटने घेतलेल्या विकेटचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

virat kohli
IND vs NED: नेदरलँडविरुद्ध टीम इंडियाची आतिषबाजी! पहिल्यांदाच टॉप ऑर्डरने केलाय असा कारनामा

फलंदाजीत ठोकलं अर्धशतक..

या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी ५६ चेंडूचा सामना करत ५१ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने ५ चौकार आणि १ षटकार मारला. शतकी खेळीच्या दिशेने वाटचाल करत असताना तो बाद होऊन माघारी परतला.

virat kohli
World Cup : शुभमन गिलंनं २०२३ वर्ष गाजवलं; केली विराटलाही न जमलेली कामगिरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com