Mohammed Shami Record: टीममध्ये आला अन् पहिल्याच बॉलवर रेकॉर्ड मोडला! या बाबतीत कुंबळेलाही सोडलं मागे

Most Wickets For India In World Cup: या सामन्यात मोहम्मद शमीने मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
mohammed shami
mohammed shami twitter
Published On

Mohammed Shami Record:

न्यूझीलंडविरूद्ध होणाऱ्या सामन्यासाठी मोहम्मद शमीला भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलं आहे. या सामन्यासाठी शार्दुल ठाकुरला विश्रांती देण्यात आली आहेत. त्याच्याऐवजी मोहम्मद शमीला संधी मिळाली आहे. हा त्याच्या वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील पहिलाच सामना आहे. दरम्यान पहिल्याच सामन्यातील पहिल्याच चेंडूवर त्याने वर्ल्डकप स्पर्धेतील मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

या सामन्यातील पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने विल यंगला बाद करत माघारी धाडले. हा मोहम्मद शमीचा वर्ल्डकप स्पर्धेतील ३२ वा विकेट ठरला आहे. यासह तो वनडे वर्ल्ड स्पर्धेत भारतीय संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने माजी गोलंदाज अनिल कुंबळेला मागे सोडलं आहे.

mohammed shami
IND vs NZ Weather Report: भारत- न्यूझीलंड लढतीत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज! सामना रद्द झाल्यास काय?

वर्ल्डकप स्पर्धेत आता मोहम्मद शमीच्या नावे ३२ विकेट्सची नोदं झाली आहे. अनिल कुंबळेने ३१ गडी बाद केले होते. माजी वेगवान गोलंदाज जहीर खान या यादीत अव्वल स्थानी आहे. जहीर खानने या स्पर्धेत ४४ गडी बाद केले आहेत. तर माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ यांनी देखील वर्ल्डकप स्पर्धेत ४४ फलंदाजांनी पॅव्हेलियनची वाट दाखवली. (Latest sports updates)

विल यंगला दाखवली पॅव्हेलियनची वाट...

न्यूझीलंड संघाची फलंदाजी सुरू असताना भारतीय संघाकडून नववे षटक टाकण्यासाठी मोहम्मद शमी गोलंदाजीला आला होता. त्यावेळी विल यंग फलंदाजी करत होता. शमीने टाकलेला चेंडू यंगला कळालाच नाही.त्यामुळे चेंडू थेट यष्टीला जाऊन धडकला. विल यंग या डावात २७ चेंडूंचा सामना करून १७ धावा करत माघारी परतला.

mohammed shami
IND vs NZ Match: जे धोनी अन् विराटलाही नाही जमलं ते रोहित करून दाखवणार! NZ विरूद्धच्या सामन्यात हिटमॅन रचणार इतिहास

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com