वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या चारही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे.
पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला, दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला, तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानला आणि चौथ्या सामन्यात बांगलादेशला धुळ चारत भारतीय संघाने विजयाचा चौकार मारला होता.
आता बलाढ्य न्यूझीलंडला हरवून भारतीय संघाकडे विजयाचं पंचक साजरं करण्याची संधी असणार आहे.
सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा
सुरुवातीचे ४ सामन जिंकले असले तरीदेखील न्यूझीलंडविरूद्धचा पेपर हा भारतीय संघासाठी कठीण असणार आहे. मात्र हा सामना जिंकून रोहित शर्माला कर्णधार म्हणून इतिहास रचण्याची संधी असणार आहे.
कारण ३ दिग्गज भारतीय कर्णधारांना न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देता आलेला नाही. सध्यचा भारतीय संघाचा फॉर्म पाहिला तर भारतीय संघ न्यूझीलंडला हरवू शकतो.
या दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला तर १९७५ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाला ४ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर १९७९ साली झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडने भारतीय संघावर ८ गडी राखून विजय मिळवला होता. १९८७ साली भारतीय संघाने दमदार कमबॅक करत न्यूझीलंडवर १६ धावांनी विजय मिळवला होता.
याच स्पर्धेतील सामन्यात भारतीय संघाने ९ गडी राखून विजय मिळवला होता. १९९२ आणि १९९९ साली झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. पुढे २००३ वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने न्यूझीलंडवर ७ गडी राखून विजय मिळवला होता. २०१९ मध्ये जेव्हा हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.
त्यावेळी साखळी फेरीतील सामना पावसामुळे धुतला गेला होता. त्यानंतर सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. (Latest sports updates)
भाारतीय संघाने न्यूझीलंडविरूद्ध खेळताना शेवटचा विजय सौरव गांगुलीच्या नेतृत्वात मिळवला होता. आता रोहितला ही परभवाची साखळी तोडत विजय मिळवण्याची संधी असणार आहे.
हा सामना जिंकून, जे विराट, धोनी अन् राहुल द्रविडला नाही जमलं ते रोहित शर्माला करून दाखवण्याची संधी असणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.