

गॅस टंचाईमुळे कामगारांवर आता दुहेरी संकट कोसळलंय... एकीकडे गॅस टंचाईमुळे छत्रपती संभाजीनगरमधील मद्य निर्मिती कंपन्या ठप्प होतायत..तर दुसरीकडे हातावर पोट असणाऱ्या या कामगारांना दैनंदिन वापरासाठी गॅस मिळत नसल्यानं त्यांच्या खाण्याचेही वांदे झालेत... संभाजीनगरमधील कंपन्यांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशसह देशातल्या वेगवेगळ्या राज्यातून कामगार येत असतात... मात्र हेच कामगार आता गावची वाट धरतायत....त्यामुळे साम टिव्हीनं कामगारांना गाठून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला...
दरम्यान कामगारांनी परतीची वाट धरल्यानं कंपनी आणि मालकांसमोरच्या अडचणीत वाढ झालीय. गॅस टंचाई कायम असतानाच व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी मालकांना कसरत करावी लागत्येय. मावळमधील हॉटेल व्यावसायिकांनी चुली पेटवल्या असून ना नफा ना तोटा तत्वावर हॉटेल सुरु ठेवली आहेत.
तर चाकण एमआयडीसीतील हजारो कामगारांना गॅस मिळवण्यासाठी अक्षरशः भल्या पहाटेपासूनच लांबच लांब रांगेत तासनतास उन्हात उभं राहवं लागतयं..
एकीकडे भारतात डिजिटल इंडियाच्या गप्पा सुरु आहेत... अशावेळी दुसरीकडे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना दोन वेळच्या जेवणासाठी गॅस मिळत नाहीये. उद्योग ठप्प झाल्यानं कामगार बेरोजगार होतायत..तर हाताला काम आणि पोटाला खायला नसल्यानं कामगारांना परत गावी जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. सरकारनं वेळीच यावर तोडगा काढला नाही तर राज्यातील उद्योगधंद्यांवर याचा विपरित परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.