shubman gill twitter
Sports

IND vs NZ दुसऱ्या कसोटीतून शुभमन गिल बाहेर! समोर आलं टेन्शन वाढवणारं कारण

Shubman Gill: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या सामन्यात शुभमन गिलला संधी देण्यात आलेली नाही.

Ankush Dhavre

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यातील पहिला दिवस पावसामुळे धुतला गेला होता.

दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान रोहित शर्माने प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल केला आहे. संघातील प्रमुख फलंदाज शुभमन गिलला संघाबाहेर ठेवलं आहे.

नाणेफेक झाल्यानंतर, रोहितने प्लेइंग ११ सांगितली. त्यात शुभमन गिलचा समावेश नव्हता. बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शुभमन पोस्ट शेअर करत शुभमन गिलला बाहेर का ठेवलंय याबाबत माहिती दिली आहे.

गिलच्या मानेला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो या सामन्यात खेळण्यासाठी उतरलेला नाही. गिलने मिळालेल्या संधीचा चांगलाच फायदा करुन घेतला आहे. बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने शानदार शतकी खेळी केली होती. मात्र फिट नसल्यामुळे तो या सामन्याला मुकणार आहे.

सरफराज खानला मिळाली संधी

गिल प्लेइंग ११ मधून बाहेर होताच, सरफराज खानला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली गेली आहे. सरफराज खानचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना धावांचा पाऊस पाडला आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या इराणी कप स्पर्धेत फलंदाजी करताना त्याने मुंबईकडून खेळताना नाबाद २२२ धावांची खेळी केली. हाच फॉर्म पाहता, त्याला भारतीय संघात स्थान दिलं गेलं आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत- रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, विराट कोहली, रिषभ पंत, केएल राहुल, रविंद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड - डेवोन कॉनव्हे, टॉम लेथम, विल यंग, रचिन रविंद्र, डॅरेल मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, मॅट हेनरी, टीम साऊदी, एजाज पटेल, विलियम ओ रुक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नावात हे ३ अक्षर असलेली व्यक्ती आपल्या पत्नीला ठेवतात राणीसारखं; तुमच्या जोडीदाराचे नाव आहे का यात?

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

SCROLL FOR NEXT