Shubman Gill: शतक ठोकत शुबमनची सचिन-कोहलीच्या अनोख्या क्लबमध्ये एन्ट्री, बाबरलाही पिछाडलं

Shubman Gill Test Century: बांगलादेश विरुद्धात चेन्नई सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शुबमन गिलने आपल्या ५ वं शतक झळकावलंय. गिलने ११९ धावांची नाबाद खेळी खेळत अनोख्या क्लबमध्ये एन्ट्री केलीय.
Shubman Gill: शतक ठोकत शुबमनची सचिन-कोहलीच्या अनोख्या क्लबमध्ये एन्ट्री, बाबरलाही पिछाडलं
Shubman Gill Test Century
Published On

बांगलादेशाविरुद्धात चेन्नईमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या शुबमन गिलने आपलं पाचवं शतक झळकावलंय. गिलच्या ११९ धावांच्या नाबाद खेळीनंतर भारताने बांगलादेशसमोर ५१५ धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाला या धावसंख्येपर्यंत नेण्यात शुभमन गिलसह ऋषभ पंतने महत्त्वाची भूमिका बजावलीय. त्याने १०९ धावांची शानदार खेळी केली. भारताच्या तीन विकेट पडल्यानंतर गिल आणि पंतने भारताचा डाव सावरला. टीम इंडियाने अवघ्या ६७ धावांमध्येच तीन विकेट गमावल्या होत्या.

त्यानंतर पंत आणि गिलने ४थ्या विकेटसाठी १६७ धावांची भागीदारी केली. शुभमन गिलचे हे कसोटी क्रिकेटमधील बॅक टू बॅक शतक आहे. यापूर्वी त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या कसोटीत शतक झळकावले होते. गिलने या खेळीत १० चौकार आणि ४ गगनचुंबी षटकार ठोकले. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकारांचा टप्पाही पार केला. गिलचे या वर्षामधील हे तिसरे कसोटीचं शतक आहे. यावर्षी तो क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनलाय. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांनी यावर्षी २-२कसोटी शतके झळकावली आहेत.

Shubman Gill: शतक ठोकत शुबमनची सचिन-कोहलीच्या अनोख्या क्लबमध्ये एन्ट्री, बाबरलाही पिछाडलं
Rohit Sharma: अरे, झोपलेत का सगळे? चेन्नई टेस्टमध्ये भर मैदानात संतापला रोहित शर्मा, पाहा नेमकं काय घडलं?

२०२४ मध्ये भारतासाठी सर्वाधिक शतक करणारे फलंदाज

३ - शुभमन गिल

२ - यशस्वी जायसवाल

२- रोहित शर्मा

गिलने २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बाबर आझमला मागे टाकलंय. गिलचे २०२२ पासूनचे हे १२ वे शतक आहे, तर बाबर ११ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

२०२२ मध्ये कसोटीमध्ये सर्वाधिक शतक करणारे खेळाडू

१२- शुबमन गिल

११- बाबर आझम

११ -जो रुट

१० - विराट कोहली

९- ट्रेव्हिस डेड

९-डेरिल मिशेल

दरम्यान वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशीप शुबमन गिल ५ वं शतक आहे. डब्ल्यूटीसीमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतक करणारा दुसरा खेळाडू ठरलाय. या यादीत रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com