IND vs NZ, 1st Test: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना एम चिन्नास्वामीच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्याला १६ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार होती.
मात्र पहिल्या दिवशी बंगळुरूत तुफान पाऊस पडला. त्यामुळे पहिल्या दिवशी टॉसही होऊ शकला नाही. दरम्यान दुसऱ्या दिवशी बीसीसीआयने सामन्यातील वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना नियोजित वेळेनुसार, सकाळी ९:३० वाजता सुरू होणार होता. मात्र पहिल्या दिवशी जोरदार पाऊस पडला आणि दिवसाचा खेळ टॉस न होताच रद्द करण्यात आला. त्यामुळे बीसीसीआयने दुसऱ्या दिवसातील खेळ लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ हा आज म्हणजे १७ ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू आहे. पहिल्या दिवसाचा वेळ वाया गेल्यामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ लवकर सुरू करण्यात येणार आहे. आधी टॉस ९ वाजता केला जाणार होता.
आता टॉस ८:४५ ला केला जाईल. तर ९.१५ मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल. दुसऱ्या दिवसातील खेळातील पहिल्या आणि दुसऱ्या सेशनमध्ये अतिरिक्त १५ मिनिट जोडली जाणार आहेत. यासह दुसऱ्या दिवशी जर पावसाने हजेरी लावली नाही, तर ९८ षटकांचा खेळ होईल.
दुसऱ्या दिवसातील पहिला सेशन ९:१५ ला सुरू होऊन ११:३० वाजता संपेल. तर दुसऱ्या दिवसातील दुसरा सेशन १२:१० ल सुरू होईल आणि २:२५ ला संपेल. त्यानंतर तिसरा सेशन २:४५ ला सुरू होईल आणि ४: ४५ ला संपेल. जर या सामन्यात पावसाने हजेरी लावली नाही,तर दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पहायला मिळू शकतो
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.