Maharashtra News Live Update: ऊसदर वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धाराशिवमध्ये आज चक्का जाम आंदोलन

Marathi Breaking Live Headlines Updates: अमित शाह यांचा पुणे दौरा, राष्ट्रवादीचे विलिनीकरण चर्चा, शरद पवार, सुनेत्रा पवार, छट पूजा वाद, राज्यात थंडीची चाहूल, प्रदूषण वाढले, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News

Dharashiv: ऊसदर वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धाराशिवमध्ये आज चक्का जाम आंदोलन

धाराशिव:

ऊसदर वाढीसह दुष्काळी मदत तातडीने देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आज चक्का जाम आंदोलन

धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील येडशी टोलनाका परीसरात 12 वाजता होणार आंदोलनाला सुरूवात

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांच्या उपस्थितीत शेतकरी संघटनेचा एल्गार

Pune: कांबरे खेबा येथे बिबट्यापासून बचावासाठी वनविभागाची जनजागृती

भोर तालुक्यातील कांबरे खेबा येथे दोन दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात दोन कालवडी ठार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

याची दखल घेत वनविभागाने गावात जनजागृती मोहीम राबवली.वनपाल विद्या पवार यांच्यासह वनविभागाच्या पथकाने ग्रामस्थांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले.

रात्री एकट्याने बाहेर पडू नये, लहान मुलांना एकटे सोडू नये, जनावरांचे गोठे सुरक्षित ठेवावेत, तसेच बिबट्या दिसल्यास दगड मारणे किंवा पाठलाग करणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले.

वनविभागाकडून परिसरात रात्रीची गस्त सुरू करण्यात आली असून रेस्क्यू टीम आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जनजागृतीमुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

Pune: जेजुरीत भरवस्तीत घरफोडी, ३ लाख १० हजारांचा ऐवज लंपास

जेजुरीत भरवस्तीत घरफोडी

३ तोळे सोने आणि १ लाख ६० हजारांची रोकड लंपास

भाऊबीजेनिमित्त कुटुंबीयांसह बाहेर गेलेल्या व्यापाऱ्याचे घर चोरट्यांनी फोडले;

तीन लाख १० हजारांचा ऐवज चोरीला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.