व्यवसाय करणाऱ्यांना मिळणार 3 लाखांपर्यंत कर्ज; PM विश्वकर्मा योजनेसाठी असा करा अर्ज

PM Vishwakarma Yojana: पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत पारंपरिक कारागिरांना 3 लाख रुपयांपर्यंत विनातारण कर्ज मिळू शकते. जाणून घ्या पात्रता, फायदे, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया.
PMVishwakarmaYojana
PMVishwakarmaYojanasaam tv
Published On: 

पारंपरिक व्यवसाय आणि कलेच्या माध्यमातून उपजीविका करणाऱ्या कारागीर व शिल्पकारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून पारंपरिक व्यवसायांना आधुनिक स्वरूप देऊन त्यांचा विस्तार करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. विशेष म्हणजे, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण, औजार खरेदीसाठी आर्थिक सहाय्य आणि सवलतीच्या व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

PMVishwakarmaYojana
Joint Bank Account : लग्न झालंय? मग पती-पत्नीने संयुक्त बँक खाते उघडाच! मिळतात हे 5 मोठे फायदे

जर तुम्हीही पारंपरिक कौटुंबिक व्यवसाय पुढे नेण्याचा किंवा स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर पीएम विश्वकर्मा योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या योजनेत सुतार, लोहार, कुंभार, शिंपी, सोनार, न्हावी, चांभार, मूर्तिकार आणि गवंडी अशा एकूण 18 पारंपरिक व्यवसायांचा समावेश आहे.

PMVishwakarmaYojana
RBI Bank : RBI चा फायनान्स कंपन्यांना मोठा दणका; ६३ कंपन्यांचे परवाने रद्द

कोणाला मिळणार योजनेचा लाभ?

पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय कमीत कमी 18 वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार स्वतः संबंधित पारंपरिक व्यवसायात काम करणारा कारागीर किंवा शिल्पकार असावा. या योजनेत एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला लाभ घेता येतो. सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य या योजनेसाठी पात्र नाहीत. तसेच मागील पाच वर्षांत काही सरकारी स्वयंरोजगार कर्ज योजनांचा लाभ घेतलेल्या व्यक्तींनाही योजनेच्या नियमांनुसार अपात्र ठरवले जाऊ शकते.

PMVishwakarmaYojana
Government Scheme : सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा 2,000 जमा केल्याने मिळतील 11 लाखांहून अधिक रुपये; पाहा संपूर्ण गणित

कारागिरांना प्रशिक्षणासह कोणते फायदे मिळणार?

मूलभूत प्रशिक्षण - 5 ते 7 दिवसांचे प्रशिक्षण

प्रगत प्रशिक्षण - गरजेनुसार 15 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक

प्रशिक्षण भत्ता - दररोज 500 रुपये

टूलकिटसाठी मदत - 15 हजार रुपयांचे ई-व्हाउचर

व्यवसायासाठी कर्ज - 3 लाख रुपयांपर्यंत विनातारण कर्ज

पहिला कर्ज टप्पा - 1 लाख रुपये

दुसरा कर्ज टप्पा - 2 लाख रुपये

व्याजदर - लाभार्थ्यांसाठी 5 टक्के

डिजिटल व्यवहार - पात्र व्यवहारांवर प्रति व्यवहार 1 रुपया, कमाल 100 रुपये प्रतिमहिना

मार्केटिंग सुविधा - ब्रँडिंग, पॅकिंग आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मदत

पीएम विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल?

1. सर्वप्रथम जवळच्या सायबर कॅफेला (CSC) भेट द्या.

2. आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती सोबत ठेवा.

3. CSC केंद्रावर बायोमेट्रिक प्रमाणीकरण म्हणजेच फिंगरप्रिंटद्वारे पडताळणी करा.

4. CSC ऑपरेटरच्या मदतीने पीएम विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत पोर्टलवर अर्ज भरा.

5. अर्ज सादर झाल्यानंतर संबंधित यंत्रणांकडून तीन टप्प्यांत पडताळणी केली जाते.

6. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्याला पीएम विश्वकर्मा डिजिटल आयडी दिली जाते. त्यानंतर प्रशिक्षण आणि कर्ज प्रक्रियेला सुरुवात होते.

योजनेसाठी अधिकृत वेबसाइट: [pmvishwakarma.gov.in]

अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक?

पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

आधार कार्ड (मोबाइल क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक)

बँक पासबुक आणि IFSC कोडसह बँक खात्याचा तपशील

मोबाइल क्रमांक

रेशन कार्ड (कौटुंबिक पडताळणीसाठी)

जात किंवा प्रवर्ग प्रमाणपत्र (लागू असल्यास)

संबंधित पारंपरिक व्यवसायाची माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.