IND vs NED: Twitter
Sports

IND vs NED: टीम इंडियाकडून धावांची आतिषबाजी! केएल राहुल-श्रेयस अय्यरची शतकी खेळी, नेदरलँडसमोर ४११ धावांचं आव्हान

IND vs NED: टीम इंडियाला नमवण्यासाठी नेदरलँडला ५० षटकात ४११ धावा करण्याचं आव्हान असणार आहे.

Vishal Gangurde

India vs Netherlands World Cup:

विश्वचषकातील ४५ व्या सामन्यात टीम इंडियाने नेदरलँडच्या विरोधात धावांची आतिषबाजी केली. के एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु असलेल्या टीम इंडियाच्या फलंदाजांनी नेदरलँडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या सामन्यात टीम इंडियाने ५० षटकात ४ गडी गमावून ४१० धावा केल्या. टीम इंडियाला नमवण्यासाठी नेदरलँडला ५० षटकात ४११ धावा करण्याचं आव्हान असणार आहे. (Latest Marathi News)

टीम इंडियाच्या फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली आहे. टीम इंडियाच्या सलामीवीर फलंदाजांनी धमाकेदार फलंदाजी केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिलने १०० धावांची भागीदारी रचली. शुभमन ३२ चेंडूत ५१ धावा करून बाद झाला. तर रोहित शर्माने ६१ धावांची खेळी खेळली. तर विराटनेही ५६ चेंडूत अर्धशकतीय खेळी खेळली. विराटने ५१ धावा केल्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तिघे बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी धावांची आतिषबाजी केली. या दोघांनी १५० हून धावांची भागीदारी रचली. या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर ४०० पार धावा केल्या. अय्यरने ८४ चेंडूत शतक पूर्ण केलं.

केएल राहुल आणि श्रेयस अय्यरच्या यांची शतकी खेळी. तर तीन फलंदाजांच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाने चार गडी गमावून ४१० धावा कुटल्या. टीम इंडियासाठी श्रेयस अय्यरसाठी १२८ केल्या. तर केएल राहुलने १०२ धावा केल्या. नेदरलँडच्या रोल्फ वान डर मर्व आणि पॉल वान मीकेरनने एक-एक गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT