Ind vs Eng 5th Test x
Sports

Ind vs Eng : ओव्हल जिंकल्यानंतर मोहम्मद सिराज रडला, पण प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला; Video बघून भावुक व्हाल

Ind vs Eng 5th Test : भारत विरुद्ध इंग्लंड ओव्हल कसोटीमध्ये मोहम्मद सिराजने कमाल गोलंदाजी केली. त्याने दोन्ही डावात तब्बल ९ विकेट्स घेतल्या. सामना संपल्यानंतर सिराज रडू लागला.

Yash Shirke

  • भारत विरुद्ध इंग्लंड ओव्हल कसोटीत भारताने विजय

  • भारताच्या विजयात मोहम्मद सिराजचा मोठा वाटा

  • सामना संपल्यानंतर सिराजला अश्रू अनावर

India vs England Test : ओव्हल कसोटीमध्ये दोन्ही डावात मिळून मोहम्मद सिराजने ९ विकेट्स घेतल्या. ही कसोटी जिंकवून देण्यासाठी त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. कसोटीच्या पाचव्या दिवशी त्याने इंग्लंडचे तीन गडी बाद केले. गस एटकिन्सनची विकेट घेतल्यानंतर सिराजने सेलिब्रेशन सुरु केले. सामना संपल्यानंतर ओव्हलच्या मैदानामध्ये सिराज कॅमेऱ्यासमोरच रडू लागला. भारताच्या विजयानंतर त्याला अश्रू अनावर झाले. सिराजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड ओव्हल कसोटी संपल्यानंतर हस्तांदोलन करण्यासाठी मोहम्मद सिराज पुढे गेला. तेव्हा ओव्हल स्टेडियममधील सर्व क्रिकेट चाहत्यांनी मोठा जल्लोष करत सिराजचे कौतुक केले. त्याने कसोटी मालिकेदरम्यान उत्कृष्ट खेळी करत चाहत्यांची मने जिंकली. शेवटच्या ओव्हल कसोटीमध्ये जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत सिराजने त्याचा क्लास दाखवला.

सामन्यानंतर लगेच दिनेश कार्तिकने मोहम्मद सिराजशी संवाद साधला. 'योग्य ठिकाणी गोलंदाजी करावी याचा मी विचार करत होते. खरं सांगायचं तर मी ब्रूकचा झेल घेईन आणि सीमारेषेवर पाऊल ठेवेन असा मला वाटले नव्हते. तो सामन्यातील टर्निंग पाँईट होता. मी नेहमीच स्वत:वर विश्वास ठेवला आहे, मी संघासाठी हे करेन असं स्वत:ला सांगत आलो आहे', असे सिराज म्हणाला.

'मी आज जेव्हा सकाळी उठलो, तेव्हा माझ्या देशासाठी, संघासाठी गेम चेंजर बनेन असे स्वत:ला सांगितले होते. सर्वांनी खूप मेहनत घेतली. आम्ही शेवटपर्यंत एकत्र लढलो. believe असा स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट मी गुगलवरुन घेतला आणि वॉलपेपर म्हणून लावला', असे वक्तव्य मोहम्मद सिराजने केले. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत सिराजने सर्वाधिक २३ विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात उलथापालथ होणार? आठवलेंच्या ऑफरनंतर प्रकाश आंबेडकरांच्या 'वंचित'ने ठेवली एक अट

Shocking : रिंग रोडवर धक्कादायक प्रकार, तरूण जोडप्यानं विष प्राशन करुन संपवलं आयुष्य

Maharashtra Live News Update: निलेश घायवळवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

EPFO: दिवाळीच्या आधी ७ कोटी कर्मचाऱ्यांना खूशखबर, सरकारने केले PF च्या नियमांमध्ये मोठे बदल

Maharashtra Government: सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे एकनाथ शिंदेंच्या योजना बंद?

SCROLL FOR NEXT