Ind vs Eng Test : मियाँ मॅजिक! इंग्लंडला ७ धावा हव्या होत्या, शेवटची विकेट कशी मिळाली? पाहा भारताच्या विजयाचा क्षण; Video

Ind vs Eng Test Result : गस एटकिन्सनची विकेट घेऊन मोहम्मद सिराजने भारताला ओव्हल कसोटी जिंकवून दिली. शेवटच्या विकेटच्या वेळी मैदानात काय घडलं? पाहा व्हिडीओ
Mohmmad Siraj
Mohmmad Sirajx
Published On
Summary
  • ओव्हल कसोटी भारताने अवघ्या सहा धावांनी जिंकली.

  • या विजयामुळे मालिकेत भारताने बरोबरी केला आहे.

  • सामन्यातील भारताच्या विजयाचा क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

  • शेवटच्या विकेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

India vs England Test Win : ओव्हल कसोटीमध्ये भारताचा फक्त सहा धावांनी विजय झाला. अटीतटीच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी प्रामुख्याने मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी सामना फिरवला. ८४ व्या ओव्हरमध्ये इंग्लंडला जिंकण्यासाठी ७ धावांची गरज होती. तेव्हा मोहम्मद सिराजने गस एटकिन्सनला क्लीनबोल्ड केले आणि भारताने ओव्हल कसोटी जिंकली. यानंतर मोहम्मद सिराजने त्याच्या स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले. शुभमन गिलसह सर्व भारतीय खेळाडू सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले. सामन्यातील शेवटच्या विकेटचा थरार स्टेडियममधील कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. शेवटच्या विकेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ लाईट्स आणि पावसामुळे थांबवण्यात आला. पाचव्या दिवशी भारताला जिंकण्यासाठी ४ गडी बाद करणे आवश्यक होते. दुसऱ्या बाजूला इंग्लंडला फक्त ३५ धावा करायच्या होत्या. शेवटच्या निर्णायक दिवशी भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या संघाला ३६७ धावांवर रोखले. मोहम्मद सिराजने तीन आणि प्रसिद्ध कृष्णाने एक विकेट घेतली.

Mohmmad Siraj
Ind vs Eng : नाइट वॉचमन म्हणून आला अन् इंग्लंडला धुतलं; फिफ्टी ठोकताच आकाश दीपची मैदानावरील Reaction Viral

पाचव्या कसोटीमध्ये इंग्लंडने टॉस जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. पहिल्या डावात भारताने २२४ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडचा संघ २४७ धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडकडे २३ धावांची आघाडी असताना भारताचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आला. भारताने इंग्लंडला ३९७ धावांचे आव्हान दिले. भारतीय गोलंदाजांनी सहा धावा बाकी असताना इंग्लंडला ऑलआउट केले.

Mohmmad Siraj
Ind vs Eng : ओव्हल कसोटीमध्ये राडा! एकटा यशस्वी जैस्वाल इंग्लंडच्या खेळाडूंना भिडला, मैदानात काय घडलं? Video

अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमधील पहिला कसोटी सामना भारताने गमावला. एजबॅस्टनच्या दुसऱ्या कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवत भारताने मालिकेत बरोबरी केली. तिसऱ्या सामन्यामध्ये इंग्लंडने विजय मिळत आघाडी घेतली. चौथा सामना ड्रॉ झाला. चौथ्या कसोटीनंतर भारताला मालिकेत बरोबरी करण्याची संधी होती. या संधीचे भारतीय संघाने सोने केले.

Mohmmad Siraj
Ind vs Eng : DSP सिराजचा पंच! अटीतटीच्या सामन्यात भारताचा ऐतिहासिक विजय, अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी बरोबरीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com